Electricity theft pudhari photo
नाशिक

AIMA Mahavitrans | महावितरण आणि 'आयमा'च्या संयुक्त बैठकीत 90 टक्के वीजविषयक समस्या मार्गी

AIMA Mahavitrans | 'आयमा' मासिक बैठकीत उद्योजकांच्या शंकांचे निरसन

पुढारी वृत्तसेवा

सिडको : पुढारी वृत्तसेवा

औद्योगिक क्षेत्रातील वीजविषयक समस्यांच्या सोडवणुकीसाठी 'आयमा'- महावितरणच्या गत तीन बैठकांमध्ये उद्योजकांनी मांडलेल्या प्रश्नांपैकी सुमारे ९० टक्के समस्या सोडवण्यात आल्या असून, उर्वरित प्रश्नही लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती 'आयमा'चे अध्यक्ष राजेंद्र पानसरे यांनी दिली.

स्मार्ट मीटर, थकबाकीच्या नोटिसा आणि वीजपुरवठ्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
'आयमा'चे अध्यक्ष राजेंद्र पानसरे, सरचिटणीस संजय महाजन, सचिव दिलीप वाघ, ऊर्जा समितीचे चेअरमन रवींद्र झोपे, खजिनदार अविनाश बोडके, 'निमा'चे उपाध्यक्ष मनीष रावळ, महावितरणचे कार्यकारी अभियंता चेतन वाडे, जगदीश जाधव यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.

स्मार्ट मीटरच्या शंकांचे निरसन होणार:

स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेबाबत उद्योजकांनी उपस्थित केलेल्या शंकांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. उद्योजकांना पाठवण्यात आलेल्या थकबाकीच्या नोटिसांचाही मुद्दा चर्चेला आला. या संदर्भात उद्योजकांच्या शंकांचे निरसन करण्यावर भर देण्यात आला.

दिवाळीत शटडाउन टाळणार:

आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी नियोजित शटडाउन घेतला जाणार नसल्याचेही बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे सणासुदीच्या काळात औद्योगिक उत्पादन आणि कामकाज सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे. यावेळी सुमित तिवारी, समाधान साबळे, योगेश कुन्हे, अजय अहुजा, नितीन साळुंखे, नितीन आव्हाड, गणेश कुशारे, ऋषभ बोथरा, संतोष नांदवर, सचिन शाह, संतोष झाडे आदी उद्योजक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT