नाशिक रोड : महावितरणच्या लकी डिजिटल ग्राहक योजनेचा तिसरा व अंतिम लकी ड्रॉ बुधवार (दि.11) ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला असून, त्यात नाशिकमधील १६० ग्राहक भाग्यशाली ठरले आहेत.
ही योजना 1 जानेवारी ते 31 मे या कालावधीत ऑनलाइन बिल भरणाऱ्या ग्राहकांसाठी होती. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी महावितरणकडून ही विशेष योजना राबविण्यात आली होती. या योजनेत प्रत्येक विभागासाठी : प्रथम बक्षिसासाठी ३२, द्वितीय बक्षिसासाठी ६४, तर तृतीय बक्षिसासाठी ६४ अशी एकूण १६० ग्राहकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. बक्षीस स्वरूपात स्मार्टफोन व स्मार्ट घड्याळे दिली जाणार आहेत. हा लकी ड्रॉ संगणकीय पद्धतीने काढण्यात आल्याची माहिती वितरण अधिकाऱ्यांनी दिली. ग्राहकांनी आपले नाव यादीत आहे की नाही, यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आव्हान करण्यात आले आहे.