नाशिक : उत्तर भारताकडून येणाऱ्या गार वाऱ्यांमुळे राज्यतील अनेक शहरांचे किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवले गेले. शुक्रवारी (दि. १२) राज्यातील सर्वाधिक निच्चांकी तापमान निफाड येथे ५.७ अंश सेल्सियअस नोंदवले गेले. त्यामुळे निफाड राज्यातील सर्वांधिक थंड ठरले आहे.
निफाड पाठोपाठ अहिल्यानगरमध्ये जास्त थंडी होती. नाशिक जिल्ह्याचे तापमान ७.८ अंश सेल्सियअस नोंदवले गेले. हे तापमान या हंगामातील सर्वात निच्चांकी ठरले. त्यामुळे नाशिक गारेगार झाले आहे.
राज्यात हुडहुडी वाढली आहे. नाशिकमध्ये ७.८ तापमानाची नोंद झाली. सलग तिसऱ्या दिवशी नाशिकमधील तापमानाचा पारा घसरलेला होता. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर हवेत गारवा होता. शहरात सकाळी हवेतील गारठा वाढला होता. सायंकाळी सहापासूनच नाशिककरांना हुडहुडी जाणवत होती. निफाडमध्ये पारा ५.७ अंशावर गेला. पुढचे दोन-तीन दिवस थंडी कायम राहण्याची शक्यता आहे.
थंडी वाढण्याची शक्यता
जळगाव, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. धुळे, निफाड आणि अहिल्यानगरच्या काही भागांत तापमान ४ अंशांपर्यंत कोसळले आहे. उत्तरेकडील थंड लहरी कायम राहिल्याने पुढील काही आठवड्यांत थंडी वाढू शकते. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार ला निनोच्या प्रभावामुळे डिसेंबर आणि जानेवारी हे दोन्ही महिने थंड ठरण्याची शक्यता आहे.