Maharashtra Chamber election complaint 
नाशिक

Maharashtra Chamber of Commerce Election | महाराष्ट्र चेंबरमध्ये 'प्रगती'चा विजय निश्चित

Maharashtra Chamber of Commerce Election | संगीता पाटील, रतन पडवळ यांना प्रतिसाद : वाढीव मतदान 'प्रगती'च्या बाजूने

पुढारी वृत्तसेवा

सत्ताधाऱ्यांनी अनंत प्रयत्न करून 'प्रगती' पॅनलला निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला सारण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा प्रयत्न लोकशाहीची गळचेपी अन् हुकूमशाहीचा उगम असाच होता. मात्र, 'प्रगती'ने सत्ताधाऱ्यांचे हे मनसुबे नेस्तानाबूत करीत, महाराष्ट्र चेंबरमध्ये लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लढा दिला. त्यास सभासद मतदारांनीदेखील भरभरून प्रतिसाद दिल्याने, 'प्रगती'च्या वरिष्ठ उपाध्यक्षपदाच्या उमेदवार संगीता पाटील आणि नाशिक उपाध्यक्षपदाचे उमेदवार रतन पडवळ यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे.

या दोन्ही उमेदवारांना सभासद मतदारांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून, दोन दिवसांत झालेल्या वाढीव मतदानाचा कौल या दोन्ही उमेदवारांच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा असल्याची व्यापार, उद्योग वर्तुळात चर्चा आहे. महाराष्ट्र चेंबरमध्ये लोकशाही नांदूच नये, अशी सत्ताधाऱ्यांची धारणा आहे.

यातून त्यांनी विरोधकांना संपविण्याचा घाट घातला. कटकारस्थान रचून 'प्रगती' पॅनलच्या उमेदवारांचे मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज बाद केले. या उमेदवारांना तक्रार निवारण समितीतही न्याय मिळू नये, यासाठीही कुटील डाव खेळला. सभासद मतदारांनी सत्ताधाऱ्यांची ही कुटील निती उघड्या डोळ्यांनी बघितली. तसेच सत्ताधाऱ्यांना धडा शिकविण्याचा निर्धारही केला.

प्रगतीच्या संगीता पाटील आणि रतन पडवळ यांना ज्या पद्धतीने मतदारांकडून प्रतिसाद मिळाला, त्यावरून मतदारांनीच हुकूमशाहांना धडा शिकविण्याचा निर्धार केला. दोन दिवसांतील मतदारांचा उत्साह बघ बघता, प्रगती पॅनलच्या विजयाचा शंखनाद जवळपास निश्चित मानला जात आहे.

शहराबरोबरच ग्रामीण भागातूनदेखील मोठ्या प्रमाणात मतदारांकडून दोन्ही उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र चेंबरच्या इतिहासात जेव्हा-जेव्हा वाढीव मतदान झाले, तेव्हा-तेव्हा सत्ताधारी हुकूमशाहांचा पराभव झाला आहे. यावेळीदेखील इतिहासाची पुनर्रावृत्ती होणार असून, 'प्रगती' पॅनलचा विजय जवळपास निश्चित आहे.

अनंत प्रयत्न करून आम्हाला संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही निर्धाराने लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मैदानात उतरलो. सभासद मतदार राजांनी आम्हाला आतापर्यंत भरभरून प्रतिसाद दिला. मतदानाच्या शेवटच्या दिवशीदेखील मतदार आमच्या बाजूनेच मतदान करतील, असा विश्वास आहे. सभासदांच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढत असून, पुढच्या काळातदेखील सभासदांचे हित समोर ठेवून आमची वाटचाल असेल.
कांतीलाल चोपडा, नेतृत्व, प्रगती पॅनल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT