नाशिक : महायुती सरकारच्या मंत्र्यांचे खातेवाटप शनिवारी (दि.21) रात्री जाहीर करण्यात आले. त्यानुसार गृहमंत्रालय फडणवीस यांनी स्वतकडे कायम ठेवत नगरविकास आणि गृहनिर्माण खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तर अर्थमंत्रालय अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील मंत्री दादा भुसे यांना शालेय शिक्षण, नरहरी झिरवाळ यांना अन्न व औषध प्रशासन, तर माणिकराव कोकाटे यांना कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. जळगावचे गुलाबराव पाटील यांना पाणीपुरवठा, गिरीश महाजन यांना जलसंधारण, जयकुमार रावल यांना राजशिष्टाचार मंत्री म्हणून कामकाज पाहतील, तर संजय सावकारे यांना वस्त्रोद्योग मंत्रालय प्रदान करण्यात आले आहे.
गेल्या शनिवारी (दि.14) मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. परंतु मंत्र्यांचे खाते जाहीर करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे महायुतीत भाजप, अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गटाच्या वाट्याला कोणती खाती मिळणार, याबद्दल उत्सुकता वाढली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे गृहखाते राहिले आहे. नवी मुुंबईतील गणेश नाईक यांना वन खात्याची जबाबदारी मिळाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमध्येही त्यांच्याकडे हेच खाते होते. पंकजा मुंडे यांना पर्यावरण व पशु संर्वधन तर धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा हे खाते आले आहे.
बहुतांश मंत्र्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे खाते देण्यात आलेली आहे. त्यामुळे भाजपने कोणताही वाद होणार नाही, ही काळजी घेतल्याचे दिसून येत आहे.
देवेंद्र फडणवीस: गृह
एकनाथ शिंदे: नगरविकास, गृहनिर्माण
अजित पवार: अर्थ
गिरीश महाजन: जलसंपदा
गणेश नाईक: वन
गुलाबराव पाटील: पाणी पुरवठा आणि स्वच्छता
दादा भुसे: शालेय शिक्षण
संजय राठोड: मृदू संधारण
धनंजय मुंडे: अन्न नागरी पुरवठा
मंगल प्रभात लोढा: कौशल्य विकास
उदय सामंत: उद्योग, मराठी भाषा
जयकुमार रावल: राजशिष्ठाचार
पंकजा मुंडे: पर्यावरण पशू संवर्धन
चंद्रशेखर बावनकुळे: महसूल
राधाकृष्ण विखे: जलसंपदा
हसन मुश्रीफ: वैद्यकीय शिक्षण
चंद्रकात पाटील: उच्चतंत्र शिक्षण
अतूल सावे: ओबीसी विकास
अशोक उईके: आदिवासी विकास
शंभूराज देसाई: पर्यटन
आशिष शेलार: माहिती आणि तंत्रज्ञान
दत्ता भरणे: क्रीडा आणि युवक कल्याण
आदिती तटकरे: महिला आणि बाल विकास
शिवेंद्रराजे भोसले: सार्वजनिक बांधकाम
माणिकराव कोकाटे: कृषी
जयकुमार गोरे: ग्राम विकास आणि पंचायत राज
नरहरी झिरवाळ: अन्न आणि औषध प्रशासन