नाशिक : महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूरच्या नाशिक येथील विभागीय कार्यालय आणि निवासी प्रशिक्षण केंद्रासाठी दिंडोरी रस्त्यावरील २ हेक्टर पर्यायी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यास महसूल विभागाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलमंत्री यांच्या चंद्रशेखर बावनकुळे माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाज्योतीच्या नाशिक येथील विभागीय कार्यालय, निवासी प्रशिक्षण केंद्र आणि इतर सुविधांसाठी यापूर्वी प्रस्तावित असलेल्या जागेऐवजी दिंडोरी रस्त्यालगत गट क्र. ११९/३ मधील २ हेक्टर जमीन देण्याचा सुधारित प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार ही जमीन महाज्योतीला देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ही जमीन २ या भोगाधिकार भोगवटादार वर्ग धारणाधिकाराने, किमतीने देण्यात येणार आहे.
मूल्यरहित आणि जमीन महसूलमुक्त जमिनीचा वापर केवळ मंजूर कामांसाठीच करावा लागणार आहे. ताबा मिळाल्यानंतर तीन वर्षांच्या आत संबंधित काम सुरू करणे बंधनकारक आहे. शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय जमिनीचे हस्तांतरण किंवा पोटविभाजन करता येणार नाही.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महाज्योतीच्या माध्यमातून संशोधन, प्रशिक्षण आणि विविध शैक्षणिक उपक्रमांना चालना दिली जात आहे. नाशिकमधील विभागीय कार्यालय आणि प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक जागा उपलब्ध झाल्यामुळे या उपक्रमांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांना आणि प्रशिक्षणार्थीना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याला शासनाचे प्राधान्य आहे.Umed Mall approval 21 districts Maharashtra| नाशिकसह राज्यभरात उभारणार 'उमेद मॉल', २१ जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यात मंजुरी