आडगाव (नाशिक) : नाशिक शहरालगत असलेल्या आडगाव शिवारातील चारी नंबर ७ जवळ शनिवारी (दि. २७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बिबट्या दिसल्याने परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
आडगाव शिवारातील मते मळा परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. काही नागरिकांनी बिबट्याच्या हालचालींचे व्हिडिओ मोबाइलमध्ये चित्रीत केले. ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बिबट्याच्या दर्शनानंतर परिसरातील शेतकरी, मजूर व नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. रात्री घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन समाज माध्यमात नागरीक करत आहेत. मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले होते. बिबट्या आढळल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तातडीने पिंजरा लावावा बिबट्याने परिसरातील एका लहान मुलावर हल्ला केला होता. तेव्हाच वनविभागाला याबाबत माहिती दिली होती. मात्र, वनविभागाला बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यश आलेले नाही. परिसरात गस्त वाढवून तातडीने पिंजरा लावावा.अमोल मते