नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क | शहरासह गावातही बिबट्याचा मुक्तसंचार होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गावातील दुर्गम पाड्यावर बिबट्याने पशुधनासह मनुष्यबळी घेतल्याने चिमुरड्यांचा नाहक बळी जात आहे. वनविभाग मात्र पिंजरा ठराविक ठिकाणी लावून हात वर करत असल्याने बिबट्याचा अधिवास दिसून येत आहे. अशाचप्रकारे मखमलाबाद रोडवरील फाडोळ मळ्यात बिबट्याचा वावर असल्याचा आढळून आले आहे. शुक्रवार (दि.4) आज रोजी सकाळी ९.३० वाजता हा बिबट्या दिसून आला असून त्याचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. बघा....