पायल राजेंद्र चव्हाण या युवतीचा युवतीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. Pudhari News Network
नाशिक

Leopard Attack Nashik | बिबट्याच्या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू

दिंडोरी तालुक्यातील वनारवाडीतील घटना

पुढारी वृत्तसेवा

दिंडोरी (नाशिक): तालुक्यातील वनारवाडी शिवारात घास कापण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीय युवतीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. पायल राजेंद्र चव्हाण असे मृत युवतीचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक-कळवण रस्त्यावर वाघाड कालव्यालगत राहणाऱ्या राजेंद्र चव्हाण यांची मुलगी पायल सायंकाळी जनावरांसाठी घास कापण्यासाठी गेली होती. यावेळी बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. नातेवाइकांनी तातडीने धाव घेत आरडाओरडा करत बिबट्याला पळवून लावले. मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी तत्काळ दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नागरिकांनी वन विभागावर रोष व्यक्त केला. परिसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत असते. जनावरांवर हल्ले होत आहे. काही महिन्यांपूर्वी गुराखी मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. मात्र, वनविभाग उपाययोजना करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वनविभागाने पिंजरे लावत बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. पायल ही मविप्र महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत होती. तिच्या दुर्दैवी मृत्यूने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT