Leopard attack 
नाशिक

Nashik Leopard attack | जऊळके दिंडोरीत बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून होत आहे

पुढारी वृत्तसेवा

जानोरी: दिंडोरी तालुक्यातील जऊळके दिंडोरी शिवारात मुंबई आग्रा महामार्ग लगत असलेल्या शेतात तानाजी खंडेराव जोंधळे (वय 44) हे आपल्या गव्हाच्या शेताला पाणी देत होते. त्यावेळी समोरून अचानक आलेल्या बिबट्याने जोंधळे यांच्यावर हल्ला चढवला.

यावेळी जोंधळे यांनी प्रतिकार केल्याने चिडलेल्या बिबट्याने त्यांच्या पाठीस चावा घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी तानाजी जोंधळे यांच्या समवेत असणाऱ्या त्यांच्या पत्नीने आरडा ओरड केल्याने बिबट्याने लगतच्या शेतात धूम ठोकली. जखमी झालेले तानाजी जोंधळे यांना उपचारासाठी नाशिक सिविल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बिबट्याने सकाळी सकाळी केलेल्या हल्ल्याने जउळके दिंडोरी दहावा मैल परिसरात शेतकरी वर्गात मोठी घबराट पसरली आहे.

जऊळके दिंडोरी परिसर हा केंद्रीय संरक्षण प्रकल्पालगत असल्याने या परिसरात बिबट्यांचे वारंवार हल्ले होत असतात. परंतु बिबट्याने आज (दि.१२) दिवसा हल्ला केल्याने शेतकरी वर्गात घबराट निर्माण झाली आहे. बिबट्या लगतचे सदाशिव जोंधळे यांच्या बागेतच फिरत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. तरी वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT