Leopard Attack Pudhari
नाशिक

Nashik news | चांदवड शहरात दोन बिबट्यांचा थरार; डुकरावर हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

सुनील थोरे

चांदवड : शहरातील श्री चंद्रेश्वर गडाच्या पायथ्याशी असलेल्या कॉलनी परिसरात दोन बिबट्यांचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी रात्री उशिरा दोन बिबट्याने डुकरावर हल्ला केल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरातील रहिवासी दहशतीत आले आहेत.

चांदवड शहरातील चंद्रेश्वर गडाच्या पायथ्याशी असलेल्या वस्तीत दोन बिबटे मुक्तपणे फिरताना काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर एका बिबट्याने डुकरावर झडप घालून हल्ला केला. हा सर्व थरार रात्रीच्या वेळी गच्चीवर फिरत असलेल्या महिलेने बघितला त्यांनी तत्काळ सर्व घटना मोबाईल मध्ये कैद केली आहे. या घटनेमुळे घटना परिसरात मोठी खळबळ उडाली.

भरवस्तीत बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांनी रात्रीच्या वेळी बाहेर पडणे टाळले असून लहान मुलांना घराबाहेर सोडण्याबाबतही पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, वनविभागाने तातडीने या परिसरात पिंजरा लावून बिबट्यांना पकडावे, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT