नाशिक

Leopard Attack at Dindori | दिंडोरीत बिबट्याच्या हल्ल्यात वृद्धा ठार

नातेवाईकांनी रोखला नाशिक-कळवण मार्ग

पुढारी वृत्तसेवा

ठळक मुद्दे

  • गेल्या दोन महिन्यांत दिंडोरी परिसरातील बिबट्याच्या हल्ल्याची ही तिसरी घटना

  • बिबट्याने आतापर्यंत घेतला चार जणांचा बळी

  • पोलिस प्रशासन व वनविभागाचे निव्वळ लेखी आश्वासन; ग्रामस्थांत प्रचंड संताप

This is the third incident of leopard attack in the Dindori area in the last two months, and four people have been killed so far.

दिंडोरी (नाशिक) : दिंडोरी शिवारातील बदादे वस्तीवर शनिवार (दि. ९) दुपारी बिबट्याच्या हल्ल्यात ६५ वर्षीय जनाबाई जगन बदादे यांचा मृत्यू झाला. गेल्या दोन महिन्यांत दिंडोरी परिसरातील ही तिसरी घटना असून, आतापर्यंत चार जणांचा बळी गेला आहे. वाढत्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांत प्रचंड संताप आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी कळवण मार्गावर रास्ता राेको करत संतात व्यक्त केला. पोलिस प्रशासन व वनविभागाने नातेवाईकांनी लेखी आश्वासन दिल्याने रास्ता रोको मागे घेण्यात आला.

पालखेड औद्योगिक वसाहतीजवळील शेतात जनाबाई कोथिंबीर काढत असताना उसात लपलेल्या बिबट्याने सुमारे दुपारी ४.१५ वाजता त्यांच्यावर झडप घालून त्यांना ओढत उसात नेले. शेजारी शेळ्या चारत असलेल्या पुतण्याने आरडाओरड केली. ग्रामस्थांनी शोध घेतला असता बिबट्याने त्यांना सोडून पळ काढला. त्यांना जखमी अवस्थेत तत्काळ दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता मानेवर गंभीर जखम झाल्याने जागेवरच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Nashik Latest News

दिंडोरी : नाशिक-कळवण रस्त्यावरील ग्रामीण रुग्णालयासमोर रास्ता रोको करणाऱ्या नातेवाईक त्यांची समजूत काढताना पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर.

घटनेनंतर ग्रामस्थ व नातेवाईकांनी मृतदेह वनविभागाच्या कार्यालयात नेण्याचा प्रयत्न केला आणि नाशिक–कळवण रस्त्यावर रास्ता रोको केला. त्यामुळे वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ग्रामस्थ ठाम राहिले. अखेर वनपरिक्षेत्र अधिकारी पाटील, वनपाल अशोक काळे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर रोको मागे घेण्यात आला. वनारवाडी, पालखेड बंधारा, निळवंडी परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. पिंजरे लावले तरी ते पकडले जात नाहीत. यापूर्वी पशुधनावर हल्ले होत होते; मात्र आता माणसांवर थेट हल्ले सुरू झाल्याने ग्रामस्थांनी कायमस्वरूपी बंदोबस्त आणि सुरक्षेची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT