agriculture  
नाशिक

late kharif onion decline|लेट खरीप कांदा लागवडीत घट !

पावसाची हुलकावणी : जिल्ह्यात अवघी 39 टक्के लागवड; गतवर्षीच्या तुलेनत ५८ टक्के घट, यंदा पाण्याअभावी मालेगाव, नांदगाव, येवला, देवळ्यात परिस्थिती चिंताजनक

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : राज्यासह नाशिक जिल्ह्यात पावसाने दिलेल्या ओढ आणि दुष्काळी परिस्थितीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ऐन लेट खरीप (रांगडा) हंगामात घटलेल्या पावसामुळे यंदा कांदा लागवडीला मोठा फटका बसला असून, कृषी विभागाने निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या निम्म्याहून कमी क्षेत्रावरच लागवड उरकली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लागवडीत तब्बल ५८ टक्क्यांहून अधिक घट झाली असून, कांद्याचे प्रमुख 'हब' मानल्या जाणाऱ्या मालेगाव, नांदगाव, येवला आणि देवळा या तालुक्यांमध्ये परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.

कृषी विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, नाशिक जिल्ह्यात लेट खरीप हंगामासाठी एकूण ५२ हजार ८३८.१८ हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवडीचे सरासरी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. मात्र, मान्सूनच्या उत्तरार्धात पावसाने दिलेल्या ओढीमुळे विहिरी, कूपनलिका आणि स्थानिक बंधाऱ्यांमधील पाण्याचा उपसा वेगाने खाली गेला आहे.

पाण्याच्या या तीव्र टंचाईमुळे शेतकऱ्यांना लागवड थांबवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. सद्यःस्थितीत संपूर्ण जिल्ह्यात केवळ २० हजार ५८१ हेक्टर क्षेत्रावरच लागवड उरकली असून, तब्बल ३२ हजार २५७ हेक्टर क्षेत्र अद्याप कोरडेठाक पडून आहे. जिल्ह्यातील मालेगाव, नांदगाव, येवला आणि देवळा हे तालुके कांदा उत्पादनात अग्रगण्य मानले जातात. मात्र, हेच तालुके यंदा दुष्काळाच्या सावटाखाली सापडले आहेत.

पावसाचे प्रमाण नगण्य राहिल्याने या चारही तालुक्यांत लागवडीचे प्रमाण चिंताजनक पातळीवर घसरले आहे. विहिरींच्या तळाशी गेलेले पाणी आणि भूगर्भातील घटलेली पाण्याची पातळी यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. लेट खरीप कांद्यासाठी शेतकऱ्यांनी महागडे बियाणे, खते आणि मजुरीवर हजारो रुपयांचा खर्च करून कांदा रोपे (रोपवाटिका) तयार केली होती. मात्र, ऐन लागवडीच्या वेळी पाऊस गायब झाल्याने ही रोपे वाफ्यांमध्येच वाळून जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा हजारो रुपयांचा सुरुवातीचा भांडवली खर्च पूर्णपणे पाण्यात गेला आहे.

कांद्याचे दर वाढणार

आहेत. लेट खरीप कांद्यासाठी शेतकऱ्यांनी महागडे बियाणे, खते आणि मजुरीवर हजारो रुपयांचा खर्च करून कांदा रोपे (रोपवाटिका) तयार केली होती. मात्र, ऐन लागवडीच्या वेळी पाऊस गायब झाल्याने ही रोपे वाफ्यांमध्येच वाळून जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा हजारो रुपयांचा सुरुवातीचा भांडवली खर्च पूर्णपणे पाण्यात गेला आहे.

लेट खरीप (रांगडा) कांदा हा जानेवारी ते मार्च या कालावधीत बाजारात विक्रीसाठी येतो. यंदा लागवड क्षेत्रात ६० टक्क्यांपर्यंत घट झाल्याने पुढील वर्षाच्या सुरुवातीला बाजारात कांद्याची आवक प्रचंड घटण्याची शक्यता आहे. आवक घटल्यास ग्राहकांसाठी कांद्याचे दर गगनाला भिडू शकतात, तर उत्पादनच हाती न आल्यामुळे शेतकऱ्यांना मात्र वाढीव दराचा कोणताही थेट फायदा मिळणार नाहीत.

गतवर्षीच्या तुलनेत ५८ टक्क्यांनी घट

मागील वर्षी याच कालावधीत (१५ ऑक्टोबरपर्यंत) नाशिक जिल्ह्यात तब्बल ४९ हजार ८३३ हेक्टर क्षेत्रावर लेट खरीप कांद्याची रोपे यशस्वीरीत्या लावली गेली होती. त्या तुलनेत यंदा लागवड क्षेत्रात तब्बल २९ हजार २५२ हेक्टरची (सुमारे ५८.७ टक्के) प्रचंड घट नोंदवली गेली आहे. वर्षभरातील हा सर्वांत मोठा घटलेला आलेख मानला जात असून, या घसरणीमुळे आगामी काळात बाजारातील कांद्याचे गणित आणि पुरवठा साखळी पूर्णपणे बिघडण्याची चिन्हे दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT