लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या उन्हाळ कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत लक्षणीय वाढ झाली आहे. लाल कांद्यानंतर आता नव्याने बाजारात दाखल होत असलेल्या उन्हाळ कांद्यालाही अपेक्षित दर मिळत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
सध्या बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी केवळ ८ ते १२ रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी कांद्याचे दर १२ ते १५ रुपयांदरम्यान होते; मात्र सध्याच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
कांदा दर घसरण्यामागे अनेक कारणे पुढे येत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे निर्यात घटली आहे. यासोबतच कंटेनर वाहतुकीच्या भाड्यात प्रचंड वाढ झाली असून, पूर्वी सुमारे ६०० डॉलर असलेले भाडे आता ६५०० डॉलरपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे कांद्याच्या निर्यातीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.
दुसरीकडे देशांतर्गत बाजारात नव्याने उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. तसेच पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि राजस्थान येथील कांदा शेजारील राज्यांमध्ये कमी दरात उपलब्ध होत असल्याने राज्यातील कांद्याची मागणी कमी झाली आहे. याशिवाय केंद्र सरकारकडून दरवर्षी आधार पूत किंमत निधी अंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत केली जाणारी कांदा खरेदीही घटवण्यात आली आहे.
यापूर्वी पाच लाख मेट्रिक टनांपर्यंत असलेले खरेदी उद्दिष्ट यंदा केवळ दोन लाख मेट्रिक टनांवर आणल्याने बाजारावर अतिरिक्त दबाव निर्माण होणार आहे. या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून कांद्याचे दर कोसळले असून, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणे कठीण झाले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करून खरेदी वाढवावी, निर्यात सुलभकरावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून जोर धरू लागली आहे.
आखाती देशात जरी युद्धविराम झालेला असेल मात्र गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या युद्धामुळे कांद्याची निर्यात घटली तसेच देशांतर्गत नव्याने उन्हाळ कांद्याची आवक महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. पश्चिम बंगालच्या शेजारील राज्यांमध्ये तसेच मध्य प्रदेशमधून उत्तरेकडील राज्यांमध्ये स्वस्त दरात कांदा उपलब्ध होत असल्याने राज्यातील कांद्याची मागणी घटली असून, कांद्याच्या दरावर परिणाम दिसत आहेप्रवीण कदम, कांदा निर्यातदार व्यापारी
लाल कांदा हा उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी दराने विक्री करावा लागला, मात्र उन्हाळ कांद्यात दोन रुपये मिळतील या अपेक्षेने उन्हाळ कांद्याच्या पिकाची लागवड फेली. उन्हाळा कांदा कावणीचा हंगाम सुरू झाला असून, आज रोजी कांद्याला मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही निमणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जास्तीत जास्त कांदा कसा निर्यात होईल याकडे लक्ष दिले पाहिजे आणि राज्य सरकारने समांतर बाजारभाव योजना लागू करत दोन हजार रुपये प्रतिक्क्रिटलला कमी दराने विकल्या केलेल्या कांद्यातील फरक म्हणून अनुदान दिले पाहिजे,राजाबाबा होळकर, कांदा उत्पादक शेतकरी