ST workers: एसटी कामगार, हमालांची दिवाळी बोनसवर file photo
नाशिक

ST Depot Server Down | एसटी सर्व्हर डाउन, सीईटी परीक्षार्थी व पालकांचा खोळंबा

Depot Server Down | लासलगाव बस आगारातील सर्व्हर रविवारी (दि. १०) डाउन झाल्यामुळे तिकीट मशीन अपडेट करता येत नव्हते.

पुढारी वृत्तसेवा

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा

लासलगाव बस आगारातील सर्व्हर रविवारी (दि. १०) डाउन झाल्यामुळे तिकीट मशीन अपडेट करता येत नव्हते. त्यामुळे पहाटे पाचपासून पावणेसातपर्यंत तब्बल पावणेदोन तास एकही बस आगारातून सुटू शकली नाही. त्यामुळे प्रवाशांसह विशेषतः सीईटी परीक्षेसाठी नाशिक व अन्य ठिकाणी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले.

सीईटी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर किमान एक तास आधी उपस्थित राहणे आवश्यक असताना महामंडळाच्या सर्व्हर यंत्रणेत आलेल्या बिघाडामुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचता आले नाही. काही विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांत संतापाचे वातावरण निर्माण झाले.

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असल्याने लासलगावकडील बसगाड्या निमाणी बसस्थानकावर थांबवल्या जात आहेत. त्यातच परतीच्या प्रवासात चांदोरी बसस्थानकाजवळ लासलगाव बसचा ब्रेकडाउन झाल्याने विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा मनस्ताप आणखी वाढला.

तब्बल ४२ अंश तापमानात विद्यार्थ्यांना उन्हात बसची प्रतीक्षा करावी लागली. या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेक पालकांनी विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. त्यासाठी अतिरिक्त आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागला.

सर्व्हर डाउन झाल्यामुळे वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करावा लागला. परतीच्या प्रवासातही बस नादुरुस्त झाल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागला. लासलगाव आगाराचा कारभार सुधारणे गरजेचे आहे.
धीरज महाजन, पालक, लासलगाव
सव्र्व्हर डाउनच्या तांत्रिक अडचणीमुळे 66 महाराष्ट्रातील अनेक आगारांत ही समस्या निर्माण झाली होती. युद्धपातळीवर प्रयत्न करून अडचण दूर करण्यात आली असून, बससेवा सुरळीत करण्यात आली आहे.
- सविता काळे, आगारप्रमुख, लासलगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT