Nashik 
नाशिक

Nashik- लासलगावहून ऑस्ट्रेलिया, मलेशियातही हापूस निर्यात

यंदाच्या हंगामात तब्बल ३२० मेट्रिक टन आंब्याची विकिरण प्रक्रिया पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

लासलगाव: राकेश बोरा नाशिक जिल्ह्यातील लासलगाय येथील भाभा अणुसंशोधन केंद्र कृषक विकिरण केंद्राने आंया निर्मातीत मंदा उल्लेखनीय कामगिरी करीत जागतिक बाजारपेठेत मोठी झेप घेतली न्यूर्किनंतर आता अऑस्ट्रेलिया आणि मलेशियालाही चवदार हापूस आंब्याची थेट निर्यात करण्यात आली आहे. या हंगामात आतापर्यंत ३२० मेट्रिक टन आंब्याची विकिरण प्रक्रिया पूर्ण आली आहे. गात अमेरिकेला ३०९ मेट्रिक टन, ऑऑस्ट्रेलियाला ६ मेट्रिक टन आणि मलेशियाला ३ मेट्रिक टन आंबा पाठविण्यात आला आहे.

सुमारे ८८ हजार बॉक्समधील हापूस व केशर आंबा प्रक्रिया करीत निर्वात करण्यात आल्याची माहिती प्रकल्प अधिकारी संजय आहेर यांनी दिली. या केंद्रात २००२ ते २००६ दरम्यान केवळ कांद्याचे विकिरण होत होते. मात्र, २००७ शसून आंब्यावरही प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीला भाभा अणुसंशोधन केंद्र आणि पणन मंडलाच्या ताब्यात असलेला हा प्रकल्प सध्या हिंदुस्थान अँग्रो लिमिटेड या खासगी कंपनीकडून चालवला जात आहे. मागील वर्षों आवश्यक प्रमाणपत्रे वेळेत न मिळाल्यामुळे निर्यात ठप्प झाली होती. मात्र, यंदा परिस्थिती पूर्णपणे बदलाली आहे याबाबत समाधान व्यक्त होत आहे.

आणखी देशांकडे निर्यात सज्ज

लासलगाव केंद्रातून पुढील काही दिवसांत अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आणि मलेशिया या देशांत निर्यात होणार आहे. भारतातून दरवर्षी ५० हजार टन आंबा निर्मात होतो. ज्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. यंदा ३१ जूनपर्यंत ३ हजार टन निर्यात होण्याचा अंदाज आहे

जागतिक बाजारात भारतीय आंब्यांची क्रेझ

हापूस, केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत, दशहरा, लंगडा, चौसा असा विविध जातींना परदेशात मोठी मागणी आहे. लासलगाव येथील विकिरण केंद्रामुळे या निर्यातीला मोठी चालना मिळत असून, शेतक-यांसाठी है केंद्र उत्पन्नाचा नवा आधार ठरत आहे.

युद्धामुळे लांबा निर्यातजाढ झाली आहे. याकडे लक्ष देऊन फ्रेट दर कमी राहतील आणि निर्यातीला प्रोत्साहन मिळेल याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे

-प्रकाश खाखर, के. बी. एक्स्पोर्ट

कोयीतील कीड नष्ट

चव आणि गुणवत्ता स्वाचित राहते. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय आंब्याची मागणी अधिक वाढत आहे.

गॅमा विकिरणामुळे टिकाऊपणा

कोकणातील हापूस आणि गुजरातमधील केशर आंबा लासलगाव येथे आणून गॅमा किरणांच्या साहाय्याने विकिरण प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेमुळे आंबा अधिक काळ ताजा राहतो,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT