K.V.N.Naik Sanstha Election
व्ही. एन. नाईक शिक्षण संस्था File Photo
नाशिक

K.V.N.Naik Sanstha Election | केव्हीएन नाईक शिक्षण संस्थेसाठी आज मतदान

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी (दि.२७) मतदान होणार आहे. संस्थेच्या आवारात असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालय, कला- वाणिज्य, फार्मसी महाविद्यालय या ठिकाणी मतदान होणार आहे. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचे आवाहन एकमेकांविरोधात उभे असलेल्या चारही पॅनलच्या प्रमुखांनी केले आहे.

तालुकानिहाय मतदानकेंद्र

  • सिन्नर : अभियांत्रिकी इमारत मुख्य प्रवेशद्वार

  • निफाड व चांदवड : फार्मसी महाविद्यालय इमारत

  • नांदगाव, सटाणा व कळवण : अभियांत्रिकी इमारत पूर्व प्रवेशद्वार

  • येवला व मालेगाव : नूतन मराठी इमारत

  • दिंडोरी, पेठ आणि सुरगाणा : अभियांत्रिकी इमारत पश्चिम प्रवेशद्वार

  • नाशिक शहर व तालुका, इगतपुरी, मुंबई, संगमनेर, चाळीसगाव : संस्थेच्या आवारातील मुख्य इमारत.

नाईक शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाच्या एकूण २९ जागांसाठी ११८ उमेदवार रिंगणात उभे आहेत. निवडणुकीमध्ये यावेळी प्रथमच चार पॅनल असल्याने उमेदवारांची संख्या जास्त झाली आहे. निवडणुकीसाठी विद्यमान अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी माजी माहिती संचालक शिवाजी मानकर, कमलेश बोडके यांच्यासह क्रांतिवीर विकास पॅनलची निर्मिती केली आहे. माजी अध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह परिवर्तन पॅनलची निर्मिती केली आहे, तर विद्यमान सहचिटणीस तानाजी जायभावे आणि सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी प्रगती पॅनल तयार केले आहे. तर मनोज बुरकुले यांनी अभिजित दिघोळेंसह चौथ्या नवऊर्जा पॅनल असे चार पॅनल एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.

SCROLL FOR NEXT