नाईक शिक्षण संस्था निवडणूक  pudhari news network
नाशिक

K.V.N.Naik Sanstha Election | मनधरणीनंतर मतमोजणीस सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणसंस्थेच्या २०२४ ते २०२९ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ८१.७७ टक्के मतदान झाले आहे. एकूण ८४१७ सभासदांपैकी ६८८३ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मात्र निवडणुकीदरम्यान झालेल्या अविश्वासामुळे चारही पॅनलच्या नेत्यांकडून निवडणूक अधिकाऱ्यांची मनधरणी करण्यात आली. त्यानंतर आज रविवार (दि.२८) रोजी मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

नाईक शिक्षण संस्था निवडणूक मतदानावर काही उमेदवारांनी अविश्वास दाखविल्यानंंतर निवडणूक निर्णय मंडळाने मतमोजणी न करण्याचा पवित्रा घेतला होता. त्याबाबत सर्व उमेदवारांना मंडळाने पत्र देखील दिले होते.

चारही पॅनलच्या नेत्यांकडून निवडणूक अधिकाऱ्यांची मनधरणी करण्यात आली. त्यावर निवडणूक अधिकारी ॲड. ताडगे यांनी सर्व प्रमुख नेत्यांकडून लेखी लिहून घेतल्यानंतर रविवार (दि.२८) रोजी मतमोजणीला सुरुवात होत आहे. सुरुवातीला सर्व जागांच्या मतपत्रिका विभाजन होणार असून बाद मतपत्रिका बाजूला काढल्यावर २५ चे गठ्ठे तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT