Kumbh Mela Nashik : सिंहस्थ रस्त्यांसाठी महापालिकेकडून सल्लागाराची नियुक्ती Pudhari News Network
नाशिक

Kumbh Mela Nashik : सिंहस्थ रस्त्यांसाठी महापालिकेकडून सल्लागाराची नियुक्ती

रस्त्यांचे प्राकलन, सर्वेक्षण व डिझाईनची जबाबदारी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या माध्यमातून तयार केल्या जाणाऱ्या दोन हजार कोटींच्या रस्ते कामांसाठी महापालिकेने सल्लागाराची नियुक्ती केली आहे. रस्त्यांचे सविस्तर प्राकलन, सर्वेक्षण आणि डिझाईन तयार करून देण्याची जबाबदारी या सल्लागार कंपनीवर असणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या माध्यमातून अंतर्गत व बाह्य रिंगरोड या महत्वाच्या कामांबरोबरच मुकणे पाणीपुरवठा विस्तारीत योजना, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अशी महत्वाची कामे हाती घेण्यात आली आहेत. नाशिक महापालिकेने कुंभमेळा प्राधिकरणाकडे एकूण ५९ रस्त्यांची कामे मंजुरीसाठी सादर केली आहेत.

Nashik Latest News

रस्त्यांची प्राकलने ढोबळ व अंदाजित स्वरुपाची असल्याने सविस्तर प्राकलने तयार करतांना रस्त्यांचे सर्वेक्षण आयआरसी, मॉर्थ तसेच पीडब्ल्युडी बी या संस्थांच्या मार्गदर्शक तत्वांनुसार विविध चाचण्या घेऊन ५९ रस्त्यांचे मानकंनाप्रमाणे डिझाईन करुन त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी महापालिकेने १० सल्लागारांकडून देकार मागविले होते. त्यापैकी सिव्हीलटेक इंडीया प्रा. लि. नाशिक यांनी रस्त्याचे सर्वेक्षण व डिझाईनची कामे विहीत वेळेत पूर्ण करुन देण्याची तयारी तसेच दरांबाबतही सर्वात कमी दराने कामे करुन द्यावयाची तयारी दर्शविली आहे. ५९ रस्त्यांच्या प्रस्तावांपैकी कुंभमेळा प्राधिकरणाने आधी १८ आणि त्यानंतर आता नऊ अशा २७ रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. उर्वरित रस्त्यांच्या कामांना टप्याटप्प्याने प्राधिकरणाची प्रशासकीय मान्यता मिळणार असली तरी प्राधिकरणाकडून नेमक्या किती रस्ते कामांना प्रशासकीय मान्यता मिळणार याची निश्चितता नाही. त्यामुळे सल्लागार कंपनीकडून ५९ कामांचा स्वतंत्र कामनिहाय वेगवेगळे प्रकल्प अहवाल तयार करून घेण्यात येणार असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे.

सल्लागार ही कामे करणार

मार्गदर्शक तत्वांनुसार रस्ते कामांकरीता विविध चाचण्या घेणे, सर्वेक्षण करुन संबंधित रस्त्यांचे डिझाईन करणे, सविस्तर प्रकल्प अहवाल, प्राकलने तयार करणे, करारनाम्यातील दरांमध्ये वाटाघाटी करुन कामांसाठी त्यांचा सुधारीत दर कळविणे, कामे कालमर्यादीत स्वरुपाची असल्याने सदर कामे करण्यासाठी त्यांना आवश्यक असलेला कालावधी कळविणे, अशी जबाबदारी सल्लागार कंपनीची असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT