सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी प्राधान्यक्रमानुसार कामांना सुरुवात झाली असून सुक्ष्म नियोजनासाठी नाशिक जिल्ह्याच्या अद्ययावत उच्च रिझोल्युशन उपग्रह प्रतिमा मागवल्या आहेत. Pudhari News Network
नाशिक

Kumbh Mela Nashik: सिंहस्थासाठी मागविल्या नाशिक जिल्ह्याच्या उच्च रिझोल्युशन उपग्रह प्रतिमा

आपत्ती व्यवस्थापनाचे नागपूरच्या एमआरएसएसी विभागाला पत्र

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी प्राधान्यक्रमानुसार कामांना सुरुवात झाली असून सुक्ष्म नियोजनासाठी नाशिक जिल्ह्याच्या अद्ययावत उच्च रिझोल्युशन उपग्रह प्रतिमा (हाय रिझोल्युशन सेटेलाईट इमेज) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटर (एमआरएसएसी ) नागपूर यांच्याकडून मागविल्या आहेत.

सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या 22 महिन्यांवर येऊन ठेपल्याने जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु झाली आहे. यासाठी साधुग्राम, रेल्वे प्लॅटफार्मची संख्या वाढविणे, शहरालगत 91 किलोमीटरचा रिंगरोड तयार करणे, सर्व रस्ते राज्यमार्ग, महामार्ग, समृध्दीला अन विमानतळांना जोडणे, गोदाघाटाची लांबी वाढविणे आदी कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी प्राधान्यक्रमानूसार नियोजन करण्यात येत आहे. या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणे आवश्यक आहे.

सिंहस्थासाठी पायाभूत सुविधांचा विकास व पूर्व तयारी आणि व्यापक, सुलभ नियोजन करणे आवश्यक असल्याने यासाठी नाशिक जिल्ह्याच्या उच्च रिझोल्युशन उपग्रह प्रतिमांची आवश्यकता पडणार आहे. या प्रतिमांचा वापर वाहतूक नियोजन, गर्दी व्यवस्थापन, स्रानासाठीच्या घाटांचे व्यवस्थापन, पायाभूत सुविधांचा विकास, निर्वासन मार्ग निश्चित करणे, इत्यादी. बाबींसाठी या माहितीचा वापर करण्यात येणार आहे लवकरच या प्रतिमा जिल्हा प्रशासनाला प्राप्त होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT