नाशिक : नाशिक- त्र्यंबक रस्त्यांचे काँक्रिटीकरण, पालखी मार्ग, नाशिक-दिंडोंरी-वणी-नांदुरी रस्ता रुंदीकरण, नाशिक-दिंडोरी रस्त्यावरील उनंदा नदीवरील पूल यासह विविध रस्त्यांची सुधारणा आणि रुंदीकरणाला मंगळवारी (दि. 29) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सिंहस्थ बैठकीत जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली.
बैठक विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, उपजिल्हाधिकारी भारदे, त्र्यंबकेश्वर नगरपालिका मुख्य कार्यकारी अधिकारी देवचक्के आदींसह विविध विभागप्रमुख उपस्थित होते.
बैठकीत ग्रामीण पोलिस विभागाच्या अंदाजपत्रकात विविध सूचनांचा अंतर्भाव केल्यानंतर त्याचे फेरसादरीकरण करण्यात आले. घोटी-त्र्यंबक मार्ग प्रकल्पाबाबतही चर्चा झाली. वनविभागाच्या माध्यमातून ब्रह्मगिरी, अंजनेरी, हरिहर गड, छोटा व मोठा प्रदक्षिणापद आदी विकासकामांचा आराखडा सादर झाला. यावेळी मोठ्या रस्त्यांच्या कामांना गती देण्याच्या सूचना विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिल्या.
नाशिक-त्र्यंबक रस्त्याचे काँक्रिटीकरणासह सहापदरीकरण, पालखी मार्ग 350 कोटी
नाशिक-दिंडोरी-वणी-नांदुरी रस्ता रुंदीकरण, सुधारणा 100 कोटी
नाशिक-दिंडोरी रस्त्यावरील उनंदा नदीवरील पूल 15 कोटी
दुगाव ते जऊळके त्र्यंबकसाठी 215 कोटी
जानोरी ओझर 50 कोटी
भरवीर टाकेद, बैज यासाठी 119 कोटी
चिंचोली-वडगाव पिंगळा-विंचूरदळवी-पांढुर्ली रस्ता - 207 कोटी
वाडीवऱ्हे, दहेगाव, जातेगाव, तळेगाव, महिरावणी, दुडगाव, गणेशगाव रस्ता 200 कोटी
दुगाव-ढकांबे-जऊळके रस्ता 163 कोटी
शिर्डी-राहता बाह्यवळण रस्ता 165 कोटी
त्र्यंबकेश्वर-तुपादेवी-तळवाडे-उमराळे-दिंडोरी-पालखेड-जोपूळ-पिंपळगाव 215 कोटी
दुगाव-जुने घागूर-ढकांबे-आंबेदिंडोरी-जऊळके रस्ता 163 कोटी
पेठ-तोरंगण-हरसूल-वाघेरा-अंबोली-पहिणे-घोटी 205 कोटी
जानोरी-ओझर आंतरराष्ट्रीय विमानतळ - 50 कोटी
आडगाव-गिरणारे-वाघेरा-हरसूल-ओझरखेड 157 कोटी
त्र्यंबक-देवगाव-खोडाळा 47 कोटी, इतर कामे 17 कोटी.