इंदिरानगर ( नाशिक ) : कुंभमेळ्याबाबत निरंजन टकले साधूंविरोधात विनापुरावा आक्षेपार्ह विधान करत कुंभमेळ्याची बदनामी करत असल्याचा दावा करत हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने पंचवटी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
त्यांच्या वक्तव्यांमुळे संत समाजाच्या तसेच कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या. तसेच बिनबुडाचे आरोप करून सिंहस्थ कुंभमेळ्याला बदनाम करण्याचे ते कट करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलेले आहे. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे संदीप वाघ, सकल हिंदू समाजाचे कैलास देशमुख, हिंदू महासभेचे मनीष गोसावी, जिवाधार संघाचे मिलिंद कुलकर्णी, विश्व देवस्थान समितीचे नंदकिशोर भावसार आदी सदस्य उपस्थित होते.