पुढारी ऑनलाइन डेस्क | संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी कृष्णा आंधळे तीन महिन्यांपासून फरार आहे. त्याला नाशिक मध्ये बघितल्याचा दावा काही स्थानिकांनी केला आहे. याआधी जानेवारी महिन्यात देखील कृष्णा आंधळे दिसल्याची चर्चा होती. नाशिकमध्ये आता पुन्हा कृष्णा आंधळे दिसल्याचा दावा करण्यात येत आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज वरून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. सीसीटीव्ही तपासले जात आहेत.
नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील दत्त मंदिर चौकात कृष्णा आंधळेला बघितल्याचे काही लोकांनी सांगितले. त्याने कपाळाला टिळा लावला होता व तोंडाला मास्क घातलेला होता. एका मोटरसायकलवरुन कृष्णा आंधळे आणि आणखी एक साथीदार या ठिकाणी सकाळी (दि.12) साडेनऊ वाजता दिसल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्याचा तपास सुरु केला आहे. पोलिसांची तीन पथके त्याच्या शोधासाठी तयार करण्यात आली आहे.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येला तीन महिने झाले आहेत. देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित वाल्मिक कराड याच्यासह इतर आरोपी तुरुंगात आहेत. कृष्णा आंधळे हा या हत्याकांडातील नववा आरोपी असून तो अद्याप फरार आहे. सरपंच देशमुख यांना मारहाण सुरु असताना कृष्णा आंधळेने आरोपींच्या मोकारपंती या व्हाट्सपग्रुपवर व्हिडीओ कॉल केल्याचे समोर आले आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. या प्रकरणात सीआयडीने दोषारोपपत्र दाखल केले असून मुख्य आरोपी वाल्मीक कराड याला केले आहे. या प्रकरणात 9 आरोपी असून आठ जणांना अटक झाली आहे. मात्र, हत्येच्या गुन्ह्यात सहभागी असलेला कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. यातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. खंडणीसाठीच ही हत्या घडवण्यात आली हे स्पष्ट झाले असून हत्येवेळीचे फोटो दोषारोपपत्रातून समोर आलेत. काळीज पीळवटून टाकणारे निर्घृण हत्येचे फोटो पाहून महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. आज संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पहिली सुनावणी झाली. याप्रकरणाची पुढील सुनावणी 26 तारखेला होणार आहे.