CIDCO koyta gang attack  
नाशिक

Nashik CIDCO koyta gang attack -सिडकोत कोयता गँगचा धुमाकूळ; युवकावर हल्ला, चारचाकींची तोडफोड

Nashik CIDCO koyta gang attack -सिडकोत कोयता गँगचा धुमाकूळ; युवकावर हल्ला, चारचाकींची तोडफोड

पुढारी वृत्तसेवा

CIDCO koyta gang attack

सिडको : अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा कोयता गँगचा धुमाकूळ पाहायला मिळाला. सिडकोतील उत्तमनगर भागातील शुभम पार्क परिसरात युवकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल राजेंद्र बिडलान (३०, रा. शुभम पार्क, सिडको) हे गुरुवारी (दि.१४) रात्री ११.३०च्या सुमारास घराबाहेर बसलेले असताना संशयित साहिल हिरे हा तेथे मोबाइलवर शिवीगाळ करत बोलत आला. यावेळी शिवीगाळ करू नको, असे बिडलान यांनी सांगितल्याने साहिल हिरे संतापला. तुला बघून घेतो, अशी धमकी देत तो तेथून निघून गेला.

यानंतर शुक्रवारी मध्यरात्री साहिल हिरे, सोमनाथ सोनवणे, दत्ता सोनवणे व इतर साथीदारांनी हातात कोयते, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडके घेऊन शुभम पार्क परिसरात धडक दिली. त्यांनी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या तीन ते चार चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या. राहुल बिडलान यांच्या छातीवर शस्त्राने वार केला. या हल्ल्यात ते जखमी झाले असून, परिसरात गोंधळ उडाला. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

फरार आरोपींच्या शोधार्थ पोलिस पथक रवाना झाले आहेत. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

कायद्याचा धाक निर्माण करावा अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. किरकोळ कारणांवरून शस्त्रांचा वापर, मारहाण व वाहनांची तोडफोड अशा घटना सातत्याने घडत असल्याने पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे. अशा टोळ्यांवर कठोर कारवाई करत कायद्याचा धाक निर्माण करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT