नाशिक : राष्ट्रीय जाहिरात दिनानिमित्त फेडरेशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग एंटरप्रेनियर्स (फेम) तर्फे राज्यस्तरीय आर्टवर्क स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात राज्यभरातून आलेल्या उत्कृष्ट कलाकृतींमधून विजेत्यांची घोषणा करण्यात आली. यामध्ये पायताणात कोल्हापुरी पुन्हा नंबर वन असल्याचे सिद्ध झाले.
जळगावची पल्लवी जैन प्रथम
स्पर्धेत जळगावच्या पल्लवी जैन हिने प्रथम क्रमांक पटकावला. शर्वरी शरद सावंत (रत्नागिरी) द्वितीय तर तृतीय क्रमांक मीडिया हाऊस (नाशिक) व श्रीरंग लोहार (कोल्हापूर) यांनी संयुक्तपणे मिळवला. फेमचे अध्यक्ष रवी पवार यांनी विजेत्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, ‘अशा स्पर्धांमुळे माध्यम क्षेत्रातील सर्जनशीलतेला चालना मिळते तसेच नव्या कल्पनांना प्रोत्साहन मिळते.
‘स्वदेशी खरेदी करा, आत्मनिर्भर भारत घडवा’
यंदाच्या स्पर्धेची थीम ‘स्वदेशी खरेदी करा, आत्मनिर्भर भारत घडवा’ या संकल्पनेवर आधारित होती. स्पर्धेत राज्यभरातील कलाकार, जाहिरात संस्था आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी डिजिटल स्वरूपात आकर्षक आणि प्रभावी आर्टवर्क्स सादर केले. विजेत्यांची निवड विशेष परिक्षक म्हणून श्रीकांत नागरे (नाशिक), विजय क्षीरसागर (सोलापूर) आणि बालकृष्ण उदय जोशी (कोल्हापूर) यांच्या परीक्षणावर करण्यात आली.
विजेत्यांना मिळालेली पारितोषिक अशी...
प्रथम ----11,000
द्वितीय---- 5,000
तृतीय--- 3,000
अशी मिळाली श्रेणी
प्रथम - कोल्हापुरी
द्वितीय - देशी
तृतीय - जूता
तृतीय - स्वदेशी