Bhandara Crime Pudhari file Photo
नाशिक

Boat accident Death | मालवणजवळ कर्ली खाडीत होडी उलटून दुर्घटना; गणेशोत्सवासाठी सासुरवाडीला आलेला तरुण बेपत्ता!

Boat accident Death | दोघांना वाचवण्यात यश : आंबेरी वाकवाडी येथील दुर्घटना; बेपत्ता तरुण मूळ गुजरात राज्यातील

पुढारी वृत्तसेवा

मालवण : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सवानिमित्त आंबेरी-वाकवाडी या आपल्या सासुरवाडीला आलेले दर्शन चंद्रकांत टकारिया (रा. मुंबई, मूळ रा. गुजरात) हे कर्ली नदीपात्रात बुडून बेपत्ता झाले आहेत. शेती कामासाठी कुटुंबातील सदस्यांसोबत नदीपात्रा पलीकडे असलेल्या जुवा येथे होडीने (छोटी नौकेतून) प्रवास करत असताना होडी उलटून अपघात घडला. होडी चालक स्वप्निल वाक्कर यांनी प्रसंगावधान राखत होडीतील श्वेता टकारिया व प्रणल वाक्कर यांना वाचवले. मात्र, दर्शन टकारिया हे पाण्यात बुडून बेपत्ता झाले.

याबाबत माहिती पोलिस, महसूल प्रशासनास देण्यात आली. ग्रामस्थ तसेच प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. ग्रामस्थ, ग्रामपंचायत, पोलिस, महसूल यंत्रणा, पोलिसपाटील तसेच स्कूबा डायव्हिंग पथकाच्या माध्यमातून बेपत्ता दर्शन यांचा शोध सुरू आहे.

शेती कामासाठी नदीपलीकडे जात असताना अचानक होडी नदी पात्रात उलटल्याने चौघेजण पाण्यात पडले. होडीचालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे दोघे सुखरूप बाहेर आले असले, तरी दर्शन टकारिया नदीपात्रात बेपत्ता झाले. गुरुवारी सकाळी १० वा. च्या सुमारास आंबेरी-वाकवाडी परिसरात ही दुर्घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. बेपत्ता दर्शन टकारिया यांचा शोध घेण्यासाठी स्कूबा डायव्हिंग पथकाची मदत घेतली जात असून नदीपात्रात युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली जात आहे.

दुर्घटनेचा संक्षिप्त तपशील

घटक माहिती घटनास्थळकर्ली खाडी / नदीपात्र, आंबेरी-वाकवाडी (मालवण) घटना वेळगुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास बेपत्ता व्यक्तीदर्शन चंद्रकांत टकारिया (रा. मुंबई, मूळ रा. गुजरात) सुरक्षित बाहेर आलेले श्वेता टकारिया, प्रणल वाक्कर होडी चालक स्वप्निल वाक्कर (ज्यांनी दोघांचे प्राण वाचवले) शोध मोहीम यंत्रणा स्थानिक ग्रामस्थ, पोलिस, महसूल, पोलिस पाटील व स्कूबा डायव्हिंग पथक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT