man two daughters drowning Trimbakeshwar  
नाशिक

Kalyan man two daughters drowning Trimbakeshwar dam|कल्याणच्या तरुणाचा दोन लेकींसह धरणात मृत्यू, त्र्यंबकेश्वरातील हृदयद्रावक घटना

कल्याणच्या तरुणाचा दोन लेकींसह धरणात मृत्यू त्र्यंबकेश्वरातील हृदयद्रावक घटना

पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा

सध्या सर्वत्र दिवाळी सणाचा उत्साह सुरू असतानाच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेझे धरणात आंघोळीसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना भाऊबीजेदिवशीच घडली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी शिवारातील बेझे धरणाच्या लगत रहिवासी असलेले उत्तम चव्हाण यांच्याकडे दिवाळीनिमित्त वाघेरे (ता. इगतपुरी) ह. मु. तिसगाव नाका, कल्याण फाटा, कल्याण, जि. ठाणे येथील सुरेश नामदेव भोर हे कुटूंबीयासह भाऊबिजेसाठी आले होते. भोर हे बुधवारी सकाळच्या सुमारास

आपल्या दोन मुलींसह आंघोळीसाठी धरणाजवळ गेले होते, आंघोळीसाठी धरणाच्या पाण्यात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने आणि एकमेकांचा वाचविण्याच्या प्रयत्नात वडील आणि दोन मुलीही पाण्यात बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुरेश नामदेव भोर (42), ज्योती सुरेश भोर (10) आणि हर्षदा सुरेश भोर (7) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास अंबकेश्वर पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT