Rupali Chakankar Inquiry  pudhari photo
नाशिक

Ashok Kharat Case Nashik | फरार 'कल्पना' अन् गायब 'चाकणकर'

Ashok Kharat Case Nashik | खरात प्रकरणात तपास यंत्रणेसमोर नवे पेच

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भोंदू अशोक खरात प्रकरणात तपास सुरू असतानाच दोन महत्त्वाच्या महिलांच्या अनुपस्थितीमुळे पोलिसांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. शिर्डी येथील भूखंड फसवणूक प्रकरणात पोलिसांना हवी असलेली आरोपी कल्पना खरात ही गेल्या तीन दिवसांपासून फरार असून, दुसरीकडे माजी महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर या देखील चौकशीसाठी हजर राहत नसल्याने तपास प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत.

शिर्डीतील ४ एकर भूखंड खरेदी-विक्री व्यवहारात फसवणूक आणि सावकारीच्या आरोपांवरून अशोक खरातसह त्याची पत्नी कल्पना खरात व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात कल्पना खरात ही महत्त्वाची कडी मानली जात असून, तिची चौकशी होणे अत्यावश्यक आहे.

मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर ती फरार झाल्याने पोलिसांना तिचा शोध घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान, या प्रकरणात नाव समोर आलेल्या रूपाली चाकणकर यादेखील अद्याप चौकशीसाठी समोर आलेल्या नाहीत. त्यामुळे तपास यंत्रणेला आवश्यक माहिती मिळण्यात विलंब होत असून, प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनत आहे.

गेल्या काही दिवसांत या दोन्ही महिलांच्या अनुपस्थितीमुळे तपासावर परिणाम होत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, महिलांशी संबंधित गंभीर स्वरूपाच्या या प्रकरणात दोन महत्त्वाच्या महिला समोर येत नसल्याने विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे. या दोघींना कोण संरक्षण देत आहे का, किंवा तपासात अडथळा निर्माण करण्यामागे काही विशेष स्वार्थ आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

पोलिसांकडून कल्पना खरातचा शोध तीव्र करण्यात आला असून, लवकरच तिला अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे रूपाली चाकणकर यांनी चौकशीसाठी हजर राहणे गरजेचे असल्याचेही सांगण्यात येत आहे. या प्रकरणात पुढे काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT