Simhastha Kumbh Mela Nashik Pudhari News Network
नाशिक

Simhastha Kumbh Mela | गुरूच्या सिंह राशीतील भ्रमणाचा योग; सिंहस्थ कुंभमेळ्यात ज्ञान, अध्यात्म आणि संस्कृतीचा महासंगम

Simhastha Kumbh Mela | भारतीय ज्योतिष परंपरेत गुरू अर्थात बृहस्पती हा ज्ञान, धर्म, अध्यात्म, सदाचार, समृद्धी, संतती आणि भाग्याचा कारक मानला जातो.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भारतीय ज्योतिष परंपरेत गुरू अर्थात बृहस्पती हा ज्ञान, धर्म, अध्यात्म, सदाचार, समृद्धी, संतती आणि भाग्याचा कारक मानला जातो. नवग्रहांमध्ये गुरुला महत्त्वाचे स्थान असून, त्याचे राशीतील भ्रमण केवळ वैयक्तिक भविष्याशी संबंधित नसून सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक घडामोडींच्या दृष्टीनेही महत्त्वाचे मानले जाते.

याच पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वाला प्रारंभ झाला आहे. गुरुचे सिंह राशीतील भ्रमण आणि सिंहस्थ पर्व यांचा भारतीय धार्मिक परंपरेत विशेष संबंध सांगितला जातो.
सूर्य हा सिंह राशीचा स्वामी मानला जातो. सूर्य तेज, सत्ता, प्रशासन, आत्मविश्वास आणि नेतृत्वाचे प्रतीक, तर गुरुज्ञान, विवेक आणि धर्मभावेनेचा कारक मानला जातो. त्यामुळे गुरुच्या सिंह राशीतील भ्रमणाला ज्योतिष परंपरेत नेतृत्व, प्रतिष्ठा, ज्ञान आणि धार्मिक कार्याशी जोडून पाहिले जाते. मात्र, या फलितांना ज्योतिषीय मान्यता असल्याचे ज्योतिषतज्ज्ञ सांगतात.

कुंभमेळ्याचे वैशिष्ट्य

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचे खरे वैशिष्ट्य म्हणजे गोदावरीचा धार्मिक वारसा, संतपरंपरा, आखाड्यांची संस्कृती, तीर्थक्षेत्रांचे महत्त्व आणि देशभरातील भाविकांना एकत्र आणणारी श्रद्धा, गुरुच्या सिंह राशीतील प्रमाणाच्या ज्योतिषीय संदर्भासोबत या व्यापक धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा विचार केल्यास सिंहस्थ पर्याचे महत्त्व अधिक स्पष्ट होते. अनादी काळापासून अध्यात्मामध्ये असलेले कुंभमेळ्याचे महत्त्व आणि महती पाहता नाशिककरांसाठी कुंभ उत्सव अनुभवणे पर्वणी ठरणार आहे.

गुरूच्या राशीबदलाबाबत नेमकी स्थिती

  • वैदिक ज्योतिषातील निरयन पद्धतीनुसार, गुरुने ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंह राशीत प्रवेश केला. त्यानंतर २५ जानेवारी २०२७ रोजी तो वक्रती गतीने पुन्हा कर्क राशीत प्रवेश करेल. पुढे २६ जुलै २०२७ रोजी गुरुचा सिंह राशीत पुन:प्रवेश होईल. त्यामुळे गुरुचे सिंह राशीतील भ्रमण दोन टप्प्यांत होणार आहे.

  • सिंहस्थ कुंभमेळ्याचा धार्मिक संदर्भ समजून घेताना हा कालक्रम लक्षात घेणे आवश्यक आहे. गुरुचे राशीभ्रमण आणि कुंभमेळ्याच्या आयोजनामागील धार्मिक परंपरा यांचा संबंध ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार स्पष्ट केला जातो; मात्र कुंभमेळ्याचे महत्त्व केवळ ग्रहस्थितीपुरते मर्यादित नाही. त्यामागे शतकानुशतकांची धार्मिक श्रद्धा, तीर्थक्षेत्रांची परंपरा आणि साधू-संतांच्या आखाड्यांची ऐतिहासिक भूमिका आहे.

  • ज्योतिषीय मान्यतेनुसार गुरुचा संबंध उच्च शिक्षण, संशोधन, स्पर्धा परीक्षा, ज्ञानांजन आणि मार्गदर्शनाशी जोडला जातो. सिंह राशीचा संबंध नेतृत्व, आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि प्रशासनाशी लावला जात असल्याने गुरुच्या या भ्रमणातून सकारात्मक संधी निर्माण होऊ शकतात, असे पारंपरिक ज्योतिषीय विश्लेषक सांगतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT