नाशिक

राज्यात तीन ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई

ATC Raid : मालेगावसह मराठवाड्यात भल्या पहाटे कारवाई

अंजली राऊत

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क - देशविघातक कारवाया करणाऱ्या संघटनांमध्ये सहभाग असल्याच्या संशयावरुन एटीएस (Anti-Terrorism Squad - ATS) आणि एनआयएने (National Investigation Agency - NIA) शनिवारी (दि.5) पहाटे तीन ठिकाणी छापेमारी केली. देशात अनेक ठिकाणी रेड टाकण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रात छत्रपती संभाजी नगर, जालना, मालेगाव येथील काही तरुणांना पहाटे ताब्यात घेण्यात आले आहे.

शनिवारी (दि.5) पहाटे एनआयएकडून देशविघातक कार्य करणाऱ्या तरुणांवर देशभर कारवाईची मोहीम उघडण्यात आलेली आहे. यापूर्वदिखील महाराष्ट्रातील संभाजी नगर, जालना आणि मालेगाव येथे एनआयएने छापेमारी केलेली होती. पहाटेपासूनच महाराष्ट्र राज्यातील तीन ठिकाणी एनआयए आणि एटीएसच्या पथकाने छापेमारी करत काही तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. एनआयए आणि एटीएसने महाराष्ट्रात संयुक्त कारवाई केली आहे.

छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि जालना येथे NIA (National Investigation Agency ) आणि ATS ने संयुक्त कारवाई करण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि दहशतवादविरोधी पथकच्या अधिकाऱ्यांनी काही तरूणांना ताब्यात घेतले आहे. या तरूणांचा देशविघातक कृत्यामध्ये सहभाग असल्याचा संशय असून राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि दहशतवादविरोधी पथकाकडून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणाने कारवाई करण्याची ही काही पहिलीच वेळ नसून यापूर्वीही छत्रपती संभाजीनगर, मालेगावमधून काही तरुणांना ताब्यात घेण्यात आले होते. आज शनिवारी (दि.5) छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा आझाद चौक जवळील भागामध्ये कारवाई करण्यात आली आहे. तर जालना आणि संभाजीनगरमधून तीन जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेले हे तरूण देश विघातक कृत्य करण्याच्या तयारीत होते, अशी माहिती मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT