एमजी रोडवरील काँग्रेस भवन येथे सकाळी अकरा वाजता जोडो मारो आंदोलन करताना नाशिक शहर काँग्रेसचे पदाधिकारी. (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Jodo Maro Andolan : नाशिक शहर काँग्रेसच्या वतीने जोडो मारो आंदोलन

अंजली राऊत

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क् - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नुकताच कोसळल्याच्या निषेधार्थ नाशिक शहर काँग्रेसच्या वतीने एमजी रोडवरील काँग्रेस भवन येथे सकाळी अकरा वाजता जोडो मारो आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅनरला संतप्त होत जोडे मारण्यात आले.

आंदोलनप्रसंगी नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक, सर्व ब्लॉक अध्यक्ष, काँग्रेस सेवादल, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, अल्पसंख्याक विभाग, इंटक, अनुसूचित जाती जमाती विभाग, ओबीसी विभाग, असंघटित कामगार काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT