नाशिक

Jalgaon News : फुकट्या प्रवाशांकडून 50 लाखांचा दंड वसूल, रेल्वे प्रशासनाची कारवाई

गणेश सोनवणे

जळगाव पुढारी वृत्तसेवा ; भुसावळ मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामध्ये रेल्वे प्रशासनाने फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली आहे.  तिकीट तपासणी मोहिमेमध्ये विना तिकीट व अनधिकृत प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून एका दिवसात तब्बल 50 लाख 84 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

भुसावळ विभागामध्ये (दि. 9) रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक यांच्या नेतृत्वात तिकीट तपासणी मोहिम घेतली. या तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान विनातिकीट/अनधिकृत प्रवासाच्या ५,९५२ प्रकरणांतून एका दिवसात 50 लाख 84 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

सर्व बोनाफाईड रेल्वे वापरकर्त्यांना आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा सुनिश्चित करण्यासाठी, भुसावळ विभाग विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा, विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी करण्यात येते. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी, भुसावळ विभाग रेल्वे प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT