जळगाव : गेल्या वर्षी भावाचा खून केल्याच्या बदला घेण्यासाठी चार जणांनी जाम मोहल्ला डीडी कोल्ड्रिंक व टी हाऊस या ठिकाणी चार जणांनी गोळीबार केला. या गोळीबारात करून तहरीन अहमद नासिर शेख याचा खून केला व मोटरसायकल वरून रेल्वे स्टेशन व शिवाजीनगर च्या दिशेने पसार झाले. आरोपींना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलीस स्टेशनचे चार पथके रवाना झाली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत तहरीन अहमद नासिर शेख वय 30 हा दहा रोजी सकाळी नमाज पठण केल्यानंतर नेहमीप्रमाणे जाम मोहल्ला येथील डीडी कोल्ड्रिंक व टी हाऊस या ठिकाणी चहा पिण्यासाठी आला. त्यावेळेस रमि पटेल हा त्या ठिकाणी येऊन शिवीगाळ करू लागला व गेल्या वर्षी तू आमच्या भावाला मारले आहे. आता तुझा शेवट आहे असे म्हणून तनवीर मजीत पटेल यांनी गोळी झाडली ती त्याच्या उजव्या कानाखाली लागली. यामध्ये तनवीर मजीत पटेल अन्वर पटेल रमेश पटेल साहिल शेख रशीद चारही संशयित आरोपींचा समावेश आहे. गोळीबार करुन अन्वर पटेल व साहिल हे दोघे मोटरसायकलवर बसून रेल्वे स्टेशनच्या दिशेने तर तनवीर मजीद पटेल व अन्वर पटेल हे गोल्डन लॉज शिवाजीनगरच्या दिशेने पसार झाले.
जखमी असलेला तहरीन अहमद नासिर शेख याला लागलीस रिक्षातून रिदम हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी नेण्यात आले त्या ठिकाणी असलेले डॉक्टर अभिजीत काळे यांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी जाकीर महबूब खान राहणार जाम मोहल्ला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित चारही आरोपींविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ हे करीत आहे
घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी कृष्णकांत पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली. तर घटनास्थळी ठसे तज्ञ व श्वानपदकाला प्राचारण करण्यात आले होते.