पार्कींगला लावलेली दुचाकीच्या डीक्कीतून चोरट्याने रोकड लांबवली file photo
नाशिक

Jalgaon Crime News|चोरट्याने दुचाकीच्या डिक्कीतून लांबवले अडीच लाख

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : शहरातील इच्छादेवी चौकातील हार्डवेअर दुकानासमोर दुचाकी पार्कींगला लावण्यात आली होती. या संधीचा फायदा घेत चोरट्याने या दुचाकीच्या डीक्कीतून तब्बल अडीच लाख रूपयांची रोकड लांबवली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील म्हसावद येथील दिपक धोंडू चिंचोरे (वय ५१) हे रविवार (दि.२३) रोजी कामाच्या निमित्ताने शहरातील इच्छादेवी चौकात आले होते. त्यावेळी त्यांनी दुचाकी चौकातील हार्डवेअर दुकानासमोर पार्क करून लावली. मात्र कामासाठी लागणारे अडीच लाख रूपयांची रोकड त्यांनी डिक्कीतच ठेवलेली होती. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून रोकड चोरून नेली. डीक्कीतून पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर चिंचोरे यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला. परंतु कोणतीही माहिती मिळाली नसल्याने अखेर मंगळवार (दि.२५) रोजी रात्री रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT