महिलेला मारहाण करत अत्याचार; संशयिताला अटक Pudhari File Photo
नाशिक

Jalgaon Crime | घरात घुसून महिलेला मारहाण करत अत्याचार; संशयिताला अटक

पुढारी वृत्तसेवा

जळगाव | भडगाव तालुक्यातील पिंपरखेड गावातील २८ वर्षीय महिलेच्या घरात घसुन मारहाण करीत अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक असे की, भडगाव तालुक्यातील पिंपरखेड याठिकाणी २८ वर्षीय महिला घरात एकटी असताना ६ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास संशयित आरोपी गणेश संपत भिल वय २९ हा महिलेच्या घरात शिरला, त्यानंतर तिच्यासोबत अश्लिल चाळे करत असतांना महिलेने विरोध केला असता तिचे तोंडू दाबून मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर महिलेने भडगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी गणेश भिल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे हे करीत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT