file photo
नाशिक

Industrial Safety Nashik | जिल्ह्यातील औद्योगिक सुरक्षेची ऐसीतैशी

Industrial Safety Nashik | २० महिन्यांत ३६ अपघात, १६ मृत्यू; २८ गंभीर जखमी : कंत्राटदारांचा गेला बळी

पुढारी वृत्तसेवा

पुढारी विशेष सतीश डोंगरे, प्रतिनिधी

उद्योगांची भरभराट, उत्पादनवाढ आणि रोजगारनिर्मितीचे दावे एकीकडे होत असतानाच दुसरीकडे कारखान्यांत काम करणाऱ्या कामगारांच्या जिवाची मात्र कोणालाही हमी नसल्याचे विदारक वास्तव समोर येत आहे. औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांत गेल्या २० महिन्यांच्या कालावधीत झालेल्या ३६ अपघातांत तब्बल १६ कामगारांचा मृत्यू झाला, तर २८ कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

मृत्युमुखी पडलेले सर्वच कामगार कंत्राट असण्याचे कारखान्यांतील सुरक्षाव्यवस्था नेमकी कितपत प्रभावी आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या उपसंचालक कार्यालयाकडून माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२५ ते ३६ अपघातांच्या नोंदी समोर आल्या आहेत.

अंबड, सातपूर, सिन्नर, मालेगाव, दिंडोरी, इगतपुरीसह विविध अपघात झाले आहेत. त्यात १६ कंत्राटी कामगारांना प्राण गमवावे लागले. २४ जण गंभीर जखमी झाले आहेत. काही दुर्घटना, तर काही ठिकाणी स्फोटासारख्या गंभीर घटनांची नोंद आहे. दिंडोरी तालुक्यातील एका कामगार जखमी झाल्याची नोंद आहे. येते. विशेषतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२६ मधील नोंदीत कामगारांच्या मृत्यूच्या घटनांची मालिका समोर आली.

दोन महिन्यांत आठ बळी

गेल्या दोन महिन्यांत दिंडोरी, ओझर, सिन्नर, सातपूर येथील औद्योगिक वसाहतीत झालेल्या अपघातात तब्बल आठ कामगारांचा बळी गेला आहे. ४ सप्टेंबर ते २९ ऑक्टोबरदरम्यान या दुर्घटना घडल्या आहेत.

या अपघातांच्या घटनांनंतर गेल्या २ नोव्हेंबरला औद्योगिक सुरक्षा दिन साजरा करत, औद्योगिक सुरक्षा विभागाने 'सुरक्षे'चे डोस पाजले आहेत. मात्र, औद्योगिक सुरक्षेचा मूळ प्रश्न अद्यापही अधांतरी असून, आणखी किती कामगारांचे बळी गेल्यानंतर औद्योगिक सुरक्षा विभागाला जाग येणार का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

जबाबदारी कोणाची?

कारखान्यांत कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांबरोबरच कंत्राटी कामगार मोठ्या प्रमाणावर कार्यरत असतात. उत्पादन प्रक्रियेतील जोखमीची कामे, यंत्रसामग्री हाताळणे, देखभाल आणि अन्य तांत्रिक कामांत त्यांचा सहभाग असतो.

मात्र, अशा कामगारांना पुरेसे प्रशिक्षण दिले जाते का, त्यांना आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून दिली जातात का, यांवरील संरक्षण व्यवस्था कार्यरत आहे का, याची नियमित तपासणी होते का, असे प्रश्न या आकडेवारीमुळे उपस्थित झाले आहेत. याशिवाय कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेबाबत कंत्राटदार आणि कारखाना व्यवस्थापनातील जबाबदारी निश्चित होणे गरजेचे आहे.

औद्योगिक क्षेत्रात कामगारांची सुरक्षता ही विभागाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. 'अपघातमुक्त उद्योग' हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीवर देखरेख, व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये सुरक्षाविषयक जनजागृती तसेच सक्रिय सहभागावर प्रतिबन्धात्मक उपाययोजनांवर विभागामार्फत भर दिला जात आहे. औद्योगिक अपघात टाळण्यासाठी कायद्याच्या अंमलबजावणीसोबत व्यवस्थापन आणि कामगार या दोघांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. सुरक्षिततेच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणे यावर विभागाचा भर आहे.
— अंजली आडे, सहसंचालक, औद्योगिक सुरक्षा, आरोग्य संचालनालय
कामगार हे कंपनी नियुक्तत असायला हवेत. कंत्राटी कामगार कायद्याचा गैरपर करून, कंत्राटी कामगारांना कंपनीत झुंपले जाते. ते कुशल नसतानाही यांच्यावर तांत्रिक कामे सोपवली जातात. दुर्भाग्यने अपघातात एखादा कंत्राटी कामगारचा मृत्यू झाल्यास त्याची कोणीही जबाबदारी घेत नाही. उलट प्रकरण दडपण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातात. औद्योगिक सुरक्षा विभागाची भूमिका संशयास्पद आहे.
— कैललास मोरे, अध्यक्ष, महाराष्ट्र दुर्घटनाग्रस्त कामगार संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT