नाशिक : इंडो-पोलंड चेंबरच्या अध्यक्षा क्रिस्टिना व्रोबलेब्स्का यांचा सत्कार करताना निमा अध्यक्ष आशिष नहार. समवेत विन्सेंट पीटर, राजेंद्र अहिरे, मनीष रावल, राजेंद्र वडनेरे, हर्षद ब्राह्मणकर, मिलिंद राजपूत, श्रीकांत पाटील. Pudhari News Network
नाशिक

Indo-Poland Trade : इंडो-पोलंड व्यापारवृद्धीस आणखी गती देणार

दावोसला बिझनेस मीट : उद्योगांना उपलब्ध होणार नव्या संधी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : इंडो-पोलंड चेंबरच्या अध्यक्षा क्रिस्टिना व्रोबलेब्स्का आणि उपाध्यक्ष विन्सेंट पीटर यांनी गुरुवारी (दि. २७) निमा कार्यालयाला भेट दिली. भेटीदरम्यान भारत आणि पोलंड या दोन्ही देशांमधील औद्योगिक व आर्थिक क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला.

इंग्लंड आणि पोलंड या दोन्ही देशांमधील औद्योगिक तसेच व्यापारिक देवाणघेवाणीला अलीकडील काळात गती मिळत आहे. भविष्यात द्विपक्षीय व्यापारी संधी अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. नव्या गुंतवणुकीच्या संधी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि उत्पादन क्षेत्रातील नवोन्मेष यामुळे व्यापारवृद्धीची मोठी क्षमता निर्माण होत असल्याचेही इंडो-पोलंड चेंबरच्या अध्यक्षा क्रिस्टिना व्रोबलेब्स्का यांनी नमूद केले. या चर्चेत भारत-पोलंड यांच्यात अधिक दृढ आर्थिक, औद्योगिक व सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त प्रकल्प, परस्पर गुंतवणूक, औद्योगिक दौरे तसेच द्विपक्षीय व्यापार आदानप्रदानाचे विविध उपक्रम राबवण्याच्या शक्यतांवर निमा एक्स्पोर्ट कमिटी अध्यक्ष हर्षद ब्राह्मणकर यांनी प्रकाश टाकला. दोन्ही देशांतील उद्योगक्षेत्रांसाठी भविष्यात सहकार्याची नवी पर्वणी सुरू होण्याची शक्यता या चर्चेमुळे बळकट झाली आहे. याप्रसंगी निमा सचिव राजेंद्र अहिरे, उपाध्यक्ष मनीष रावल, खजिनदार राजेंद्र वडनेरे, निमा एक्स्पोर्ट कमिटी अध्यक्ष हर्षद ब्राह्मणकर, मिलिंद राजपूत, निमा स्टार्टअप कमिटी अध्यक्ष श्रीकांत पाटील, सचिन कंकरेज, कैलास पाटील, विरल ठक्कर, नानासाहेब देवरे, एन. डी. ठाकरे, जयदीप राजपूत उपस्थित होते.

---

दावोस येथे होणाऱ्या जागतिक बिझनेस मीटमुळे निमा व इंडो-पोलंड चेंबर यांच्या सहभागातून औद्योगिक व आर्थिक क्षेत्रात नव्या भागीदारी, गुंतवणूक आणि व्यापारवृद्धीच्या संधी अधिक विस्तारतील.

-आशिष नहार, अध्यक्ष, निमा.

फोटो

---

---

फोटो सीटी १ ला निमा आणि कोटसाठी आशिष नहार नावाने सेव्ह आहेत

-----

-------०--------

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT