आयकर रिटर्न भरणे Pudhari File Photo
नाशिक

Income Tax Return | 'आयटीआर'साठी करदात्यांची दमछाक

करदाता सावधान! ३१ जुलै अंतिम मुदत : मुदतीनंतर भरावा लागणार दंड

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत अवघ्या पाच दिवसांवर येवून ठेपल्याने आयटीआरसाठी करदात्यांची चांगलीच दमछाक होताना दिसून येत आहे. मुदतीनंतर भराव्या लागणाऱ्या लेटी फीसह दंड आणि व्याज टाळण्यासाठी करदात्यांकडून सनदी लेखापालांकडे एकच गर्दी केली जात आहे. दरम्यान, आयटीआर दाखल करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी सनदी लेखापाल संघटनांकडून केली जात आहे. (Updated Income Tax Return Filing)

सरकारने ठरवून दिलेल्या मूळ सवलत मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कोणत्याही व्यक्तीने आयटीआर दाखल करणे अनिवार्य आहे. यामध्ये पगारदार व्यक्ती, स्वयंरोजगार व्यावसायिक, फ्रीलांसर आणि व्यवसाय यांचा समावेश आहे. याशिवाय ज्यांचे उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी आहे, असे नागरिक देखील आयटीआर दाखल करतात. गृह कर्जासह अन्य कर्जांसाठी आयटीआर महत्त्वपूर्ण ठरत असल्याने, अनेकजण आयटीआर दाखल करतात. दरम्यान, २०२४ या आर्थिक वर्षात आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै निश्चित केली आहे. अवघे पाचच दिवस शिल्लक असल्याने, सनदी लेखापालांकडे करदात्यांकडून एकच गर्दी केली जात आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी देखील अनेकांची दमछाक होताना दिसून येत आहे. बँकेच्या स्टेटमेंट मिळविण्यासाठी बँकांमध्येही गर्दी होत आहे.

दरवर्षी आयकर विभागाकडून आयटीआरसाठी मुदतवाढ दिली जात असल्याने, अनेकांनी यंदाही मुदतवाढ मिळेल या अपेक्षेने आयटीआर भरण्यासाठी विलंब केला. परंतु आयकर विभागाने अगोदरच मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केल्याने आता करदात्यांकडून आयटीआर दाखल करण्यासाठी घाई केली जात आहे. दरम्यान, मुदतीत आयटीआर दाखल न केल्यास दंड म्हणून मोठी रक्कम खर्च करावी लागण्याची शक्यता आहे. याशिवाय मुळ रक्कमेवर व्याजही भरावे लागणार आहे.

मुदतवाढीची मागणी

अनेक करदात्यांनी अद्यापपर्यंत आयटीआर दाखल न केल्यामुळे त्यास मुदतवाढ दिली जावी अशी मागणी करदात्यांसह सनदी लेखापाल संघटनांकडून केली जात आहे. आयकर विभागाने यापूर्वीच मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे संघटनांच्या या मागणीचा आयकर विभागाकडून कितपत विचार केला जाईल, यात शंका असल्याने आयटीआर दाखल करण्यासाठी करदात्यांकडून गर्दी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT