Crime Against Child Pudhari
नाशिक

Igatpuri Crime: वसतिगृहात दहावीच्या विद्यार्थ्यांचा 5 वी ते 7 वीच्या मुलांना गुंगीच्या गोळ्या देत अत्याचार, महाराष्ट्र हादरला

Igatpuri government hostel: मेडिकल स्टोअरमधून गुंगीच्या गोळ्या आणून, दारु पाजून या विकृत मुलांनी लहान मुलांवर अत्याचार केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

पुढारी डिजिटल टीम

Igatpuri Student Abuse Case 2026

विकास काजळे, पुढारी न्यूज

नाशिक : इगतपुरीतील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात धक्कादायक घटना घडली आहे. दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. मेडिकल स्टोअरमधून गुंगीच्या गोळ्या आणून, दारु पाजून या विकृत मुलांनी लहान मुलांवर अत्याचार केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

इगतपुरीत समाजकल्याण विभागाचे वसतिगृह आहे. या वसतिगृहात दहावीत शिकणाऱ्या आठ ते नऊ विद्यार्थ्यांनी पाचवी ते सातवी इयत्तेत शिकणाऱ्या किमान सहा जणांवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले. यातील एका पीडित मुलाने आईवडिलांना घडलेल्या कृत्याची माहिती दिली आणि ही घटना उघडकीस आली.

संतप्त पालकांनी वसतिगृहात धाव घेत मुलांवर कारवाईची मागणी केली. सुरूवातीला इगतपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा गंभीर आरोपही पालकांनी केला आहे. पुढारी न्यूजच्या वृत्तानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT