पिंपळनेर पुढारी वृत्तसेवा ; पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगारांवर आळा बसावा यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपळनेर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत २३ सराईत गुन्हेगारांची ओळख परेड घेण्यात आली.
या गुन्हेगारांवर यापूर्वी दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगारांनी जातीय तेढ निर्माण करणे, चोरी करणे, शारीरिक नुकसान किंवा मालमत्तेचे नुकसान करणे, दरोडा टाकणे, दंगा करणे आदी गुन्हे केले आहेत.
ओळख परेडनंतर पोलिसांनी या गुन्हेगारांची कानउघाडणी केली. त्यांना भविष्यात गुन्हे करू नयेत याबाबत समज देण्यात आली. तसेच, काही गुन्हेगारांवर कठोर कारवाईबाबत पोलिसांकडून वरिष्ठांना प्रस्ताव पाठवला जाणार आहे.
पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी सांगितले की, भविष्यात घडणाऱ्या गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. सर्व सराईत गुन्हेगारांची ओळख करून घेऊन त्यांना चांगल्या वर्तनाची समज देण्यात आली आहे. आवश्यक असणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या प्रतिबंधात्मक कारवाया सुरूच राहणार असल्याची माहिती पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सपोनि श्रीकृष्ण पारधी यांनी दिली आहे. यावेळी पोलीस उपनिरीक्षक भूषण शेवाळे यांच्यासह संबंधित बिट हवालदार व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा :