life imprisonment Pudhari
नाशिक

Nashik Crime news | पत्नीला फोन करणाऱ्याची हत्या केल्याप्रकरणी पतीस जन्मठेप

‘तू पल्लवीला फोन का करतो‌’, असा सवाल करीत आरोपीने एकजणाला लोखंडी रॉडने मारहाण करत जीवे मारले

पुढारी वृत्तसेवा

नाशिक :

पत्नीस फोन का करतो, या किरकोळ कारणावरून एकाच्या डोक्यात लोखंडी सळईने हल्ला करून त्यास जीवे ठार मारल्या प्रकरणी नाशिक जिल्हा कोर्टाने महिलेसह चौघांना दोषी ठरवले. आरोपीने कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

नीलेश ढोके (33, रा. विठ्ठलनगर, कामटवाडा), पल्लवी ढोके (26, विठ्ठलनगर, कामटवाडे), प्रसाद मुळे (31, मंगलशक्ती अपा. इंदिरानगर) आणि सतीश आहिरे (36, रा. अष्टविनायक चौक, सावतानगर) अशी दोषी आरोपींची नावे आहेत. 8 एप्रिल 2023 रोजी या चौघांनी मिळून नितीन जाधव यास त्रिमूर्ती चौकातील गॅलक्सी हॉस्पिटल येथे गाठले. ‌‘तू पल्लवीला फोन का करतो‌’, असा सवाल करीत त्यास लोखंडी रॉडने मारहाण केली.

डोक्यात वर्मी घाव बसल्याने जखमी जाधवला आडगाव येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. अंबड पोलिसांनी चौघा आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. पीएसआय सुनील बिडगर आणि हवालदार रवींद्रकुमार पानसरे यांनी घटनेचा तपास करून पुरावे संकलित केले. खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांच्या कोर्टासमोर झाली. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता भानुप्रिया पेठकर यांनी सरकारी पक्षातर्फे बाजू मांडली. समोर आलेल्या साक्षी पुराव्यांनुसार कोर्टाने चौघा आरोपींना दोषी ठरवत जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT