hunger strike
जुन्या तहसील कार्यालयासमोर उपोषला बसलेले मटाने ता. देवळा येथील शेतकरी (छाया ; सोमनाथ जगताप )
नाशिक

नैसर्गिक आवळ्या नाला वहिवाटीसाठी खुला करण्याच्या मागणीसाठी उपोषण

पुढारी वृत्तसेवा

देवळा ; नैसर्गिक आवळ्या नाला वहिवाटीसाठी खुला करण्यात यावा या मागणीसाठी मटाने ता. देवळा येथील शेतकऱ्यांनी देवळा येथील जुन्या तहसिल कार्यालयासमोर आज गुरुवार दि. २७ पासून लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. यासंदर्भात वंचित शेतकऱ्यांनी तहसीलदार, पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले आहे .

निवेदनाचा आशय असा की, तालुक्यातील भऊर फाटा ते वाजगांव रस्त्यास लागून पूर्व-पश्चिम असा शासकीय नैसर्गिक पुर्वापार आवळ्या नाला आहे. या नाल्याचा परिसरातील १५ ते २० शेतकरी कुटूंब वापर करीत आहेत. या नाल्या व्यतिरीक्त ह्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता नसून शेत माल ने आन करण्यासाठी त्यांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.

३ वर्षापासून वहिवाट बंद

मागील शंभर वर्षापासून आमच्या अनेक पिढ्या ह्या नाल्यातून वहिवाट करून शेत माल काढत होते. परंतु गेल्या ३ वर्षापासून सामनेवाले यांनी सदरचा नाला बुजून नाल्यातील वहिवाट बंद केली आहे. त्यामुळे शेत माल मुख्य रस्त्यावर आणता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे व अजूनही नुकसान होत आहे. सदर नाला बंद झाल्याने जमिनी पडीत ठेऊन विस्तापित होण्याची वेळ आली आहे. याबाबत अनेक वेळा तहसिलदाराकडे तक्रार केली आहे. तहसीलदारांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन पहाणी केली परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही व नाला पूर्ववत खुला केला नाही.

हा नाला मोकळा करण्यासाठी आज जुन्या तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी संपूर्ण कुटुंबातील सदस्या सह लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. या उपोषण स्थळी बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, नगरसेवक जितेंद्र आहेर, सचिन सूर्यवंशी आदींनी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शविला.

SCROLL FOR NEXT