HSRP Number Plate Pudhari
नाशिक

HSRP Number Plate | नाशिककरांनो सावधान! HSRP नंबर प्लेट नसल्यास भरावा लागणार हजारोंचा दंड?

HSRP Number Plate | गाडीवर HSRP नंबर प्लेट नसेल तर काय होणार? नाशिकमध्ये विशेष कारवाई सुरू

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ५० नुसार सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने परिवहन विभागामार्फत एचएसआरपी नंबर प्लेट न बसविलेल्या वाहनांवर विशेष कारवाई मोहीम राबविण्यात येत आहे.

वाहनधारकांनी अधिकृत संकेतस्थळांवर अर्ज करून एचएसआरपी नंबर प्लेट बसवून दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिकच्या कार्यक्षेत्रातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या एकूण ११ लाख २० हजार ९१९ वाहनांपैकी ४ लाख १८ हजार ३१८ इतक्या वाहनांवरच एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यात आल्या आहेत.

१ जुलै २०२६ पासून एचएसआरपी नंबर प्लेट न बसविलेल्या वाहनांवर कारवाई सुरू असून, आतापर्यंत १२ हजार ६८३ वाहनांवर कारवाई करून सुमारे १० लाख ५२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यात एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी मे. एफटीए एचएसआरपी सोल्युशन्स प्रा. लि. या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशानुसार ३० नोव्हेंबरपर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर विशेष तपासणी व कडक कारवाई मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे वाहनधारकांनी विलंब न करता आपल्या वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसवाव्यात, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT