जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला शुक्रवारी प्रारंभ होत आहे. 1 ते 15 मे या कालावधीत स्वयंगणना करता येईल. जनगणना विभागाच्या पोर्टलवर नागरिकांना आपली माहिती भरता येणार आहे. 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणकांद्वारे प्रत्यक्ष घरयादी व घरगणना केली जाणार आहे.
पोर्टलवर अशी भरा माहिती
जनगणनेच्या//censusindia.gov.in या पोर्टलच्या होम पेजवर 'स्वयंगणना (SELF ENUMERATION) पर्यायावर क्लिक करा
तुमचा चालू मोबाईल क्रमांक द्या. त्यावर एक ओटीपी येईल, तो तिथे टाकून पडताळणी पूर्ण करा.
लॉगिन झाल्यानंतर, सर्वप्रथम कुटुंबप्रमुखाचे नाव, वय, लिंग आणि इतर वैयक्तिक तपशील भरा.
घराचा पूर्ण पत्ता, गल्ली/रस्ता, वॉर्ड क्रमांक आणि जिल्हा अशी सविस्तर माहिती अचूक नोंदवा.कुटुंबात एकूण किती सदस्य राहतात (पुरुष, महिला आणि इतर) त्यांची अचूक संख्या पर्टलमध्ये नमूद करा.
कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे नाव, शिक्षण, व्यवसाय, मातृभाषा आणि जन्मठिकाण यासारखी माहिती एकामागून एक भरा.
घराचा प्रकार (कच्चे/पक्के), पिण्याच्या पाण्याची सोय, वीज, शौचालय, वापरली जाणारी इंधने आदींसह वाहने, संगणक आदी सुविधांची माहिती द्या
सर्व माहिती भरून झाल्यानंतर ती पुन्हा एकदा नीट तपासा. काही चूक असल्यास 'एडिट' पर्यायावर जाऊन ती दुरुस्त करा.
माहिती पूर्णपणे बरोबर असल्याची खात्री करून घ्या. खात्री पटल्यानंतर 'SUBMIT' बटण दाबा.
अर्ज सबमिट झाल्यावर आयडी क्रमांक मिळेल, तो जतन करून ठेवा, त्याची प्रिंट काढा. तो घरगणनेवेळी प्रगणकाला द्या.