Hookah Parlor Raid
हुक्का पार्लर file photo
नाशिक

Nashik Crime News | हुक्का पार्लरवर छापा; मालक, ग्राहकावर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : शहरातील महात्मा नगर या परिसरात सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकत मालकासह ग्राहकास ताब्यात घेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी देखील शहरातील उच्चभ्रू परिसरात अशाप्रकारचे हुक्का पार्लर रोजरोसपणे सुरू असल्याची बाब पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आली होती. आता पुन्हा कारवाई झाल्याने शहरातील अवैध व्यवसायांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

  • शहरातील उच्चभ्रू परिसरात हुक्का पार्लर रोजरोसपणे सुरू

  • महात्मा नगर, भोसला मिलिटरी स्कूलच्या गेटजवळ विनापरवाना १२ टू १२ नावाने कॅफे चालविला जात होता.

महात्मा नगर, भोसला मिलिटरी स्कूलच्या गेटजवळ विनापरवाना १२ टू १२ नावाने कॅफे चालविला जात होता. मात्र, कॅफेआडून हुक्का पार्लर चालविला जात असल्याचे पोलिसांना कळाले. तसेच येथे प्रतिबंधित पदार्थांचे सेवन केले जात असल्याची माहितीही मिळाली. त्यानुसार गंगापूर पोलिसांनी शुक्रवारी (दि.५) ६.४५ वाजेच्या सुमारास याठिकाणी छापा टाकला. यावेळी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पदार्थ व हुक्का साहित्य आढळून आले. पोलिसांनी ३७ हजार पाचशे रुपयांचे साहित्य जप्त केले. तसेच एक ग्राहक याठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करताना मिळून आला. दरम्यान, गंगापूर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी गणेश सुदाम रेहरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पार्लर चालक हार्दीक अतुल अहिरे (२५, अभिनव रिव्हर व्ह्यु, समर्थनगर, काठे गल्ली, द्वारका) व ग्राहक कल्पेश सुभाष गांगुर्डे (३८, फ्लॅट नं. १३, प्रियतमा अपार्टमेंट, स्नेहनगर, म्हसरूळ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

SCROLL FOR NEXT