ठाणगाव : विजय काकड यांचा सत्कार करताना स्वप्निल डुंबरे. (छाया : संदीप भोर)
नाशिक

Honesty of Employee | हॉटेल कामगाराचा प्रामाणिकपणा; सोन्याचे ब्रेसलेट केले परत

Honesty is the best policy; चक्क दाेन तोळ्यांचे सोन्याचे ब्रेसलेट केले परत

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर : येथील युवा शाहीर स्वप्निल डुंबरे यांचे ठाणगाव येथे हरवलेले दोन तोळे वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट हॉटेलमधील कामगार वैभव पवार व मालक विजय काकड यांनी शाहीर डुंबरे यांना परत करून प्रामाणिकपणाचा प्रत्यय आणून दिला.

शाहीर स्वप्निल डुंबरे हे पट्टा किल्ला, सोमठाणे परिसरात फिरायला गेले होते. तेथून परत येताना ते ठाणगाव येथे विजय पाववडा सेंटर येथे नाश्ता करण्यासाठी थांबले होते. येथे त्यांच्या हातातले ब्रेसलेट हातातून गळून पडले होते. नाश्ता करून ते घरी परतले. तेव्हा त्यांना ब्रेसलेट हरविल्याचे लक्षात आले होते. कामगाराने गाळाने माखलेले ब्रेसलेट सापडल्यानंतर खुंटीला अडकून ठेवले होते

डुंबरे यांच्याकडून व्यावसायिकाचा सत्कार

दुसऱ्या दिवशी कामगाराने विजय काकड यांना ब्रेसलेट सापडल्याचे सांगितले. ते डुंबरे यांना परत करण्यात आले. शाहीर डुंबरे यांनी विजय काकड व वैभव पवार यांचा सत्कार केला. यावेळी भगवान शिरसाट, गोटीराम काकड, संतोष काळे, साहेबराव शिंदे, सागर भांगरे आदींसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT