History is illuminated by the record of Devvrat Mahesh Rekhe, a Veda idol from Ahilyanagar.
नाशिक : सतीश डोंगरे
अहिल्यानगरच्या देवव्रत महेश रेखे यांनी वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी तब्बल ५० दिवस १६५ तासांपेक्षा जास्त काळ दोन हजार वेदमंत्रांचे ग्रंथ न पाहता अखंड 'दंडक्रम पारायण' करून 'वेदमूर्ती' हा अत्यंत मानाचा किताब मिळविण्यासह 'दंडक्रम विक्रमादित्य' ही पदवी प्राप्त केली. असा किताब नाशिकच्या वेदमूर्ती नारायणशास्त्री देव यांनी २०० वर्षांपूर्वी नाशिकमध्येच प्राप्त केला होता. वेदमूर्ती देवव्रत रेखे यांच्या या ऐतिसहासिक विक्रमी कामगिरीबद्दल वेदमूर्ती नारायणशाखी देव यांच्या इतिहासाला उजाळा मिळाला आहे. दरम्यान, हे दोघेही विक्रमादित्य एकाच गुरू-परंपरेतील आहेत, हे विशेष.
नारायणशास्त्री देव हे नाशिकच्या अत्यंत विद्वान अशा धर्माधिकारी घराण्यात जन्माला आले होते. वैदिक सम्राट कै. श्रीकृष्णशाखी गोडसे गुरुजी यांच्या आजोबांकडे त्यांचे अध्ययन झाले होते. त्यांचे आजोबा काशी येथे राहत होते. नारायणशास्त्री देव यांनी त्या काळी काशीमध्ये जाऊन आपले अध्ययन परिपूर्ण केले अन् नाशिकला परतले. त्या काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती. त्यामुळे त्यांनी नाशिकमध्येच घनपारायण पूर्ण केले.
नाशिकच्या प्राचीन भद्रकाली मंदिरात त्यांनी पारायण केले होते. त्या काळी भद्रकाली मंदिरात सर्व विद्वत सभा, पाठशाळा चालत होत्या, नारायणशात्री देव त्यांचे शिष्य महामोहपाध्याय लक्ष्मीकांत दीक्षित, नारायण भानोसे है सर्व गारायणशात्री देव यांचे शिष्य होते त्यांनी आपला व्यवसाय सांभाळून एकाकी 'दंडक्रम पारायण' शंभर दिवसांत पूर्ण केले होते. त्या काळी प्रतिकूलता लक्षात घेता, त्यांना शंभर दिवसांचा अवधी लागला,
एकाच गुरुपरंपरेतील दोन शिष्य
गोडसे गुरुजीच्या आजोबांकडेच नारावणशाली देव यांचे अध्ययन झाले होते. जाता ज्या देवव्रत रेखे यांनी पारायण केले, त्यांचे वडील महेश रेखखे यांनादेखील गोहसे गुरुजीनीच वेदाचे धडे दिले होते. नाशिकला विश्वनाथ जोशी माणून होते, ते गोडसे गुरुंजीचे शिष्य होते, त्यांच्याकडेच महेश रेखो यांनी शिक्षण घेतले. २३ वर्षांपूर्वी काशीमध्ये गोडसे गुरुजींच्या माध्यमातून घनपारावण केले होते. गोडसे गुरुजींनी महेश रेखे यांना तयार केले. त्याच्यासाठी चार महिने आळंदीला राहिले. २३ वर्षांपूर्वी महेश रेखे यांनी सांगवेर विद्यालयात पन्पारायण एकाकी संपत्र केले होते, त्यावेळी निरीक्षण, परीक्षक म्हणून वैदिक सम्म्राट श्रीकृष्णशास्त्री गोडसे गुरुजी होते. त्यांच्या माशीवर्वादानेच ते पारायण झाले होते. देवव्रत रेखे हादेखील गोडसे गुरुजींच्या शिष्यपरिवारापैकी एक आहे.
दंड'क्रम म्हणणे सर्वात कठीण
' वेदाची उत्पत्ती महर्षी योगे वर याज्ञवल्क्य यांनी केली. वेदांच्या अनेक शाखा असून, त्याचा प्रचार व प्रसार महर्षी याज्ञवल्क्य चांनी भारतभर केला. सर्वाधिक मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, महाराष्ट्र, उत्तराखंड, झारखंड, हिमाचल क राज्यांमध्ये शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन शाखेचे गुरुशिष्य परंपरेने अध्ययन, अध्यापन सुरु आहे. त्याच्यामध्येच महेश रेखे यांनी आपल्या मुलाला विकृती पाठ शिकविला, शुक्ल यजुर्वेद माध्यंदिनची संहिता, संहिता झाल्यानंतर या संहितेचे पद असतात ते पदे झाल्यानंतर क्रम असतात, क्रम म्हणणे फार कठीण आहे. बोटावर मोजण्याइतपतच लोकांना ते म्हणता येतात. ते झाल्यानंतर आठ प्रकारची अष्ट विकृती असते. त्याच्यात शिखा, माला, रेखा, रथ, व्वत्र, दंड आणि घन अशा आठ विकृत्ती असतात. त्या आठ विकृतीमध्ये जो दंड क्रम असतो, तो म्हणणे अत्यंत कठीण असतो.
महाराष्ट्र पुत्रांच्याच नावे विक्रम
दंडक्रम पारायणाद्वारे वेदमूर्ती म्हणून लौकिक मिळविण्याचा विक्रम महाराष्ट्र पुत्रांच्याच नावे आहे. २०० वर्षांपूर्वी नाशिकच्या वेदमूर्ती नारायणशास्त्री देव यांनी हा पराक्रम केला होता. त्यानंतर अहिल्यानगरच्या वेदमूर्ती देवव्रत रेखे यांनी या विक्रमाला गवसणी घातली. आतापर्यंत तिघांनी असा विक्रम केल्याची नोंद असली तरी, तिसऱ्या नावाचा संदर्भ प्राप्त नाही. विद्वानांच्या मते, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन शाखेतून आतापर्यंत दोघांच्याच नावे हा विक्रम आहे.
विलक्षण बुद्धिमत्ता आणि वेदांप्रति निष्ठा असे ज्यांचे जन्माजन्मार्थित संचय असेल, त्यांच्याकडूनच हे होऊ शकते. वेदांच्या वेगवेगळ्या शाखा आहेत. शुक्ल यजुर्वेदामध्ये पूर्वी १०८ शाखा होत्या. वर्तमान स्थितीत केवळ तीन शाखा उपलब्ध आहेत. पहिली काण्व शाखा, दूसरी माध्यंदिन शाखा आणि तिसरी मैत्रयणी शाखा आहे. १०८ पैकी तीन शाखाच तग धरून आहेत. त्या वेगवेगळ्या पद्धतीने म्हणण्याची पद्धती आहेत. दंडक्रम पारायण म्हणणे अत्यंत दरापरत असून, वेदमूर्ती नारायणशास्त्री देव यांच्यानंतर देवव्रत रेखे यांनी ही किमया साधली, त्याचा अभिमान वाटतो.- वेदाचार्य स्वींद्र पैठणे