नाफेड'च्या दोन अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या file photo
नाशिक

NAFED | 'नाफेड'च्या दोन अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

पुढारी वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : नाफेड अध्यक्षांनी अचानक केलेल्या पाहणीनंतर उघड झालेल्या अनियमितता प्रकरणी प्रशासकीय कार्यवाहीला प्रारंभ झाला आहे. त्याअंतर्गत नाफेड कार्यालयाचे कांदा व्यापारप्रमुख सुनील कुमार यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. तर पिंपळगावचे कांदा लेखापाल हिमांशू यांचीदेखील बद्दली करण्यात आली आहे.

नाफेड व 'एनसीसीएफ'ची गोदामे एकच आहे, असे दाखवून केंद्र सरकारची कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली. तसेच 'नाफेड'चा कांदा परस्पर दुबईला फिरवण्यात आलेला असल्याची माहितीसमोर येत आहे. तर चांगल्या प्रतिचा कांदा दुबईला पाठवून दुय्यम दर्जाचा कांदा 'नाफेड'ची मोठी फसवणूक करण्यात आलेली आहे. यामुळेच निपक्ष यंत्रणेने या संदर्भात मोठी कारवाई केली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी, ग्राहकांना रास्त दरात कांदा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने केंद्र सरकारने एक लाख मॅट्रिक टन कांद्याचा बफर स्टॉक करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र काही अधिकाऱ्यांनी परस्पर हा कांदा दुबईला विकला. त्यामुळे याचा फायदा शेतकरी व ग्राहक या दोन्ही घटकांना झाला नाही. हा कोट्यवधींचा घोटाळा असल्याचे समोर येत आहे. शेतकरी, ग्राहक आणि शासनाचीही फसवणूक झाल्याने एका निष्पक्ष यंत्रणेमार्फत गेल्या चार-पाच दिवसांपासून चौकशी सुरू आहे. 'नाफेड'च्या सहा फेडरेशन कंपन्यांना कांदा खरेदीचे काम देण्यात आले होते. त्याचबरोबर यामध्ये परराज्यातील यंत्रणांचाही समावेश आहे. या सर्वांमध्ये सकृतदर्शनी मोठा घोटाळा झालेला असून त्यामुळेच दोन अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या करण्यात आल्या आहेत.

---------

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT