'हर घर तिरंगा' पदयात्रेत भारतमातेच्या वेशभुषेतील विद्यार्थीनी pudhari news network
नाशिक

Har Ghar Tiranga Abhiyan : 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत चिमुकल्यांची तिरंगा पदयात्रा

अंजली राऊत

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क - 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत शहर परिसरात चिमुकल्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तिरंगा पदयात्रा काढली. 'वंदे मातरम्' 'भारत माता की जय' अशा घोषणा देत देशभक्तीपर गितांच्या तालावर चिमुकल्यांनी सगळ्यांचेच लक्ष वेधले.

हर घर तिरंगा अभियानात (Har Ghar Tiranga Abhiyan 2024) वीरांच्या वारसांचा सन्मान करण्यासाठी बुधवारी (दि. १४) सकाळी पोलीसांच्या बंदोबस्तात तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. पदयात्रेत भारतमातेच्या वेशभुषेतील विद्यार्थीनीने लक्ष वेधले. तर शासकीय वाहनांनाही तिरंगाच्या फुग्यांनी सजविण्यात आले. पदयात्रेतही तिरंगा समवेत सेल्फी काढण्याचा मोह महिला शिक्षकांनी ओझरत्या क्षणांनी पटकन मोबाईलमध्ये कैद केले. मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथून पदयात्राला सुरुवात करण्यात आली. महापालिकेच्या शाळेसह शहरातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी शालेय गणवेशात हजर होत पदयात्रेत सहभाग नोंदवला. यावेळी टिळकवाडी सिग्नलवर थोड्यावेळी वाहतूक खोळंबली होती तर हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना अभिवादन करून पदयात्रेचा समारोप करण्यात आला.

शासकीय वाहनांनाही तिरंगाच्या फुग्यांनी सजविण्यात आले.
'वंदे मातरम्' 'भारत माता की जय' अशा घोषणा देत देशभक्तीपर गितांच्या तालावर चिमुकल्यांनी सगळ्यांचेच लक्ष वेधले.
पदयात्रेत तिरंगा समवेत सेल्फी काढण्याचा मोह महिला शिक्षकांनी ओझरत्या क्षणांनी पटकन मोबाईलमध्ये कैद केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT