नाशिक : दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची येजा सुरू असून पुढील चार दिवस रिमझिम पाऊस कायम राहणार असल्याने हवामान विभागाकडून ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गत दोन दिवसांत पावसाच्या हजेरीने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या महिन्यात अवकाळी पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला हाेता. आता मान्सूनचे आगमन झाल्यानंतर गायब झालेला पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. गत 36 तासांत जिल्ह्यातील नांदगाव, येवला, त्र्यंबक या तालुक्यात पाऊसाने जोरदार हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वीज पडून जीवत हनी झाली आहे. तर अनेक घरांची पडझड झाली आहे. त्यातच आता पुढील चार दिवस पावसाचा मुक्काम कायम राहणार आहे.